ताज्या घडामोडी

बुद्ध जयंतीनिमित्त विष्णुपुरी येथे बुद्ध मूर्ती स्थापना व मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

नांदेड:(दि.१३ मे २०२५)
विष्णुपुरी ता. नांदेड येथे ग्रामवासियांच्या वतीने विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८७ वी जयंती दि. १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त येथील बुद्ध विहारात आकर्षक व देखण्या बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात येऊन नीलावती आय हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नीलावती आय हॉस्पिटलच्या संचालिका तथा नांदेडच्या प्रसिद्ध फेको सर्जन डॉ.पौर्णिमा सावळे व त्यांच्या चमूने रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यक औषधी देवून उपचार केले.
शिबिराचे उद्घाटन यशवंत महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख आणि स्व.सदाशिवराव पाटील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.गौतम दुथडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात मोठ्या संख्येने गरजूंनी नेत्र तपासणी व उपचाराचा लाभ घेतला.
यावेळी गुरु ऑप्टिकल्सचे बंडू मदेवाड, भगवानराव मस्कुरकर व त्यांचा स्टाफ यांचेही सहकार्य लाभले. थायलंड देशात तयार झालेली बुद्ध मूर्ती सिडको येथील रहिवासी पारुबाई पवळे यांच्या धम्मदानातून देण्यात आली; त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभ सामुदायिक पंचशील व त्रिशरण ग्रहण करण्यात आले. तदनंतर गावातील मुख्य रस्त्यांनी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी विशाल हटकर, उत्तम सावळे, काळबा कांबळे, भिमराव हटकर, अरविंद हटकर, जळबाजी सोनकांबळे, मनेष हटकर, प्रशांत कांबळे, सतीश हटकर, शिवानंद सोनकांबळे, रणधीर हटकर, सुनील जमदाडे, विनायक कांबळे, सुनील सावंत, नितीन जमदाडे, अमोल कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणपती सोनकांबळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
बुद्ध पौर्णिमा आणि त्यानिमित्त आयोजित समाजसेवामय उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.