स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात डॉ. एस.आर.रंगनाथन यांची जयंती साजर

—————————————-
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय, स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज, स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या वतीने ग्रंथालयाचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यापीठावर प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड, उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, संजय हट्टे, संगणकशास्त्र विभागाचे प्रभारी प्रा. राशेद दायमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमात ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शेषनारायण जाधव यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालयाचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या जीवन व कार्य यांचा परिचय विद्यार्थ्याना करून दिला तसेच नियमित ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थी यांचा सत्कार देखील करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. पटेल सायमा, काजल सांगवे तर आभार उषा गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल शकुंतला सोनकांबळे, अजित रंगवाड, स्वप्ना द्वासे, प्रा. आसिफ दायमी, प्रा.नावेद मणियार, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा.नम्रता कुलकर्णी, प्रा. रोहिणी वाघमारे, प्रा.सचिन तोगरीकर, प्रा.उस्ताद सर, प्रा. अंजली रविकुमार, शीतल तोगरीकर, अमोल भाटकुले, अपर्णा काळे यांनी परिश्रम घेतले.