डीजिटल मिडियाच्या युगातही आकाशवाणीची लोक प्रियता कायम.

मानवत / प्रतिनिधी.
आज डिजीटल मिडियाच्या माध्यमातून सर्व सामान्याना माहिती उपलब्ध होत असून ही मात्र या सर्वा सोबतच आकाशवाणी ने आपली लोक प्रियता कायम ठेवत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य चाहत्याच्या मनावर ताबा मिळविला असून त्यामूळे आकाशवाणीची लोकप्रियताचा आलेख उंचावत असून त्यामूळे रेडिओची मागणी होतांना पाहावयास मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे की,
आज सर्वत्र डिजीटल मिडियाचे साम्राज्य स्थापित असून हि खडा नं खड्याची इंथभूत अमाहिती अवघ्या सेंकदात उपलब्ध होत असतांनाच मात्र आकाशवाणी ने आपली लोकप्रियता तिळमात्र कमी होऊ दिली नाही.
सूप्रभात पासून ते शेत शिवार, महिलासाठी महिला जगत ,विचार शलाखा, कृषिवाणी, विविध मूलाखती राष्ट्रीय बातमी पत्र ते शेतकर्यासाठी, बालकूमारांसाठी, विविध शासकिय योजनाची माहिती ग्रामिण जनतेला आकाशवाणीच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने ग्रामिण भागासह शहरी भागात ही आकाशवाणी परभणी केंद्राची लोकप्रियता वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
,,