भारतीय संविधानातील मूल्यांचे जतन केल्यास धर्मनिरपेक्षता अबाधित-डॉ.गोकुळदास गायकवाड

–
नांदेड:(दि.३ एप्रिल २०२५)
भारतीय संविधानातील मूलतत्त्वाचे जतन केल्यास भारताचे धर्मनिरपेक्ष तत्त्व अबाधित राहील, असे उद्गार डॉ. गोकुळदास गायकवाड, समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना प्रशिक्षण केंद्र, अहमदनगर यांनी यशवंत महाविद्यालयाच्या सामाजिक समरसता आणि नवोउपक्रम समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते तथा मार्गदर्शक म्हणून बोलताना काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते .
पुढे बोलताना डॉ.गायकवाड म्हणाले की, आज देशात जातीयता वाढत असून धर्माच्या नावाने विभागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा बाबी लोकशाहीला मारक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे भारताचे धर्मनिरपेक्षता तत्व अबाधित ठेवायचे असेल तर राज्यघटनेचे मूलतत्व जतन केले पाहिजे तरच देशाची एकता आणि अखंडता टिकून राहील.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक अजित साळवे, रासेयो प्रशिक्षण केंद्र रॉय जनार्दन यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रास्ताविक सामाजिक समरसता आणि नवोपक्रम समितीचे समन्वयक डॉ.शिवराज बोकडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.संभाजी वर्ताळे यांनी केले तर आभार डॉ.राजरत्न सोनटक्के यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ.संतोष मोरे, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ. कैलास इंगोले, डॉ.बालाजी भोसले,डॉ.रमेश चिल्लावार आदींनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ. एल.व्ही.पदमाराणी राव, सहसमन्वयक डॉ.साहेब शिंदे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.