प्लास्टिक मुक्त हत्तीबेट करण्यासाठीं रासेयोच्या स्वयंसेवकांनी घेतले परिश्रम

—————— ——–
उदगीर:- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबीर दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान मौजे देवर्जन (हत्तीबेट) ता. उदगीर येथे होत आहे.
या शिबिराच्या माध्यमातून हत्तीबेट या पर्यटन स्थळी येथे जमा झालेला कचरा, प्लास्टिक बॉटल, रासेयो च्या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, ज्येष्ठ पत्रकार व्ही एस कुलकर्णी, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहूल पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोळा करून मुक्त केले आहे.
यावेळी हत्तीबेट व आजुबाजूचा सर्व परिसर स्वयंसेवकांनी साफ केला यात जवळ पास शंभर पोते भरून प्लास्टिक बॉटल व कचरा जमा करण्यात आला.
या कार्यात हत्तीबेट येथील वनरक्षक सचिन सूर्यवंशी, सुयश स्वामी,रामेश्वर पलनते,अनिल देसाई,आदित्य बिरादार,प्रसाद कोमडापुरे,रामेश्वर चामले, श्रीपाद पांचाळ, अजय साखरे, वैभव बस्तापुरे, साईनाथ रेड्डी, रोहित बिजराळे, लक्ष्मीकांत मरशिवणे, सचिन बिरादार यांच्या सह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.