ताज्या घडामोडी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नांदेड पेपर मूल्यांकनात महाराष्ट्रात अग्रेसर

दि . १६ जानेवारी २०२५ आज य.च.मु . विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू मा . डॉ . संजीव सोनवणे सर तसेच कुलसचिव मा. डॉ . दिलीप भरड सर यांनी नांदेड येथील विभागीय कार्यालयास भेट दिली .आजच्या भेटीचे विशेष प्रयोजन म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा जानेवारी 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या या परीक्षा उत्तर पत्रिका मूल्यांकनाचे कार्य महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठाच्या विविध विभागीय कार्यालया अंतर्गत अनेक कॅप सेंटरवर हे काम पूर्ण करण्यात आले यात विशेषतः नांदेडला विभागीय कार्यालया अंतर्गत पहिली वेळेसच उत्तर पत्रिका मूल्यांकनाचे कार्य ऑनलाइन पद्धतीने करण्याचे ठरविण्यात आले या कार्या अंतर्गत नांदेड विभागाद्वारे 79446 उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करण्यात आले या मूल्यांकनाच्या कार्यासाठी नांदेड विभागीय कार्यालयात कॅप प्रस्थापित केलता त्या अंतर्गत 42023 उत्तर पुस्तिका तपासण्यात आल्या एकंदर संपूर्ण महाराष्ट्रातील परीक्षा मूल्यांकनाच्या कार्याचा विचार केला तर यावर्षी नांदेड विभागाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे .या संदर्भात कुलगुरू व कुलसचिव यांनी विशेष भेट देऊन कार्याची पाहणी केली . या अंतर्गत नांदेड विभागाचे संचालक व वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार मा . प्रो. डॉ . यशवंत कलेपवार सर तसेच कॅप डायरेक्टर प्रा . डॉ .दिग्विजय देशमुख या दोघांचेही प्रशंसा व अभिनंदन करण्यात आले . मुक्त विद्यापीठाद्वारे रोजगाराभिमुख विविध शैक्षणिक अभ्यासक्रम राबविण्याचे माननीय कुलगुरू महोदयांनी त्यांच्या भाषणात सांगितले .

विशेषतः या कॅप मध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून मुंजाजी कदम व आयनस्टाईन मुंडे यांनी काम पाहिले .
सदरील कार्यक्रमास प्रो. डॉ .एम . व्ही रासवे  ( उपकुलसचिव पुणे विद्यापीठ ) डॉ .प्रो.विणा लातूरकर  ( वित्त विभाग सदस्य य.च.मु . वि . नाशिक ) मा .ओमकार रासवे ( बांधकाम विभाग य.च.मु . वि . नाशिक ) हे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप डायरेक्टर प्रा . डॉ . दिग्विजय देशमुख यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा . गजानन इंगोले यांनी केले .आभार प्रदर्शन प्रा .डॉ . अविनाश कोल्थे  यांनी केले .
सदरील कार्यक्रमास प्राध्यापक डॉ. प्रवीण कुमार सेलूकर प्रा.डॉ . आवाळे  , प्रा.डॉ खिल्लारे  , प्रा.डॉ भीमराव कांबळे ,
प्रा.डॉ शैलेश कांबळे , प्रा. करण राठोड  , प्रा . नितीन मुंडलोड  , प्रा . सुरेश तिवारी  तसेच  , प्रा . एन . बी . भुमरे  , प्रा . राजेश कुंटूरकर  , प्रा .बी .बी . वानखेडे , प्रा .शशिकांत हटकर  , प्रा . डॉ . भगवान सूर्यवंशी  तसेच नांदेड विभागीय कार्यालयाचे सर्व कर्मचारी यात शेखर जगताप सर , दिलीप थोरात  ,विकास पावडे ,नितेश देशमाने , मिलिंद टोणगे , माधव वैद्य , माधव गिरे , अक्षय गिरे , गजानन कोकाटे श्रीमती लुटे इत्यादी उपस्थित होते .

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.