मुक्त विद्यापीठ रोजगाराभिमुख शिक्षणक्रम सुरू करणार – कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे

नांदेड(प्रतिनिधी) : (डॉ. प्रवीणकुमार सेलूकर) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली असून भविष्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळणार असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.
कुलगुरू डॉ. सोनवणे म्हणाले की, मुक्त विद्यापीठात आज घडीला विविध अभ्यासक्रमात पाच लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विकसित भारतासाठी अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत.
याबरोबरच परदेशात लागणारे मनुष्यबळ याचा विचार करून औद्योगिक, कृषी आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक शिक्षणक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
शिक्षणापासून वंचित असणारे तृतीय पंथ, अंध ,आणि अनाथ विद्यार्थी यांच्यासाठी मोफत शिक्षण उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार घरबसल्या ऑनलाइन अभ्यासक्रम करून सुरू करण्यात येणार आहेत.
सायबर सिक्युरिटी,
बीसीए, आहारशास्त्र एम ए योगा इंग्लिश आणि पदव्युत्तर सामाजिक शास्त्र अभ्यासक्रम या विद्यापीठाने सुरू केले आहेत.
पालघर येथील वाढवण बंदर प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) आणि वाढवण बंदर प्रकल्प मर्यादित (VPPL) यांच्यात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार (MoU) झाला असून
या करारानुसार, मुक्त विद्यापीठ
वाढवण बंदराच्या गरजांनुसार कौशल्याधारित कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करेल. या कार्यक्रमांद्वारे प्रशिक्षणाचे प्रारूप विकसित केले जाईल आणि प्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील
ज्यामुळे सागरी क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्मिती होणार आहे. त्यासाठी आवश्यक ते अभ्यासक्रम सुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सुरू करून पाच लाख मनुष्य व निर्मिती करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रो. डॉ . यशवंत कलेपवार ,पुणे विद्यापीठाचे उप कुलसचिव प्रो. डॉ .एम . व्ही रासवे , डॉ .विणा लातूरकर
शेखर जगताप , दिलीप थोरात ,विकास पावडे ,नितेश देशमाने , मिलिंद टोणगे , माधव वैद्य , माधव गिरे , अक्षय गिरे , गजानन कोकाटे डॉ .दिग्विजय देशमुख डॉ. प्रवीणकुमार सेलूकर ,
डॉ भगवान सूर्यवंशी प्रा.डॉ . शिवराज आवाळे , प्रा.डॉ खिल्लारे , प्रा.डॉ भीमराव कांबळे ,
डॉ. शैलेश कांबळे, प्रा. करण राठोड, प्रा . नितीन मुंडलोड प्रा . सुरेश तिवारी , प्रा . एन . बी . भुमरे ,डॉ. राजेश कुंटूरकर ,प्रा .बी .बी . वानखेडे प्रा .शशिकांत हटकर , डॉ भगवान सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचलन प्रा . गजानन इंगोले यांनी तर आभार डॉ . अविनाश कोल्थे यांनी मानले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आठ विभागीय केंद्रात नांदेड विभागीय केंद्र प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेशित विद्यार्थी संख्या याबाबत अग्रेसर आहे.
या विभागीय केंद्राने सर्वात जास्त ऑनलाईन पेपर मूल्यांकन केल्याबद्दल कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत कलेपवार यांच्यासह सर्वांचे कौतुक केले.


