यशवंत ‘ मध्ये स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परीक्षेस सुरळीत प्रारंभ

नांदेड: (दि.१३ नोव्हेंबर २०२५)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हिवाळी:२०२५ परीक्षेस श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात दि.११ नोव्हेंबर पासून सुरळीत प्रारंभ झालेला आहे.
माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार परीक्षा केंद्रप्रमुख डॉ.विजय भोसले, सहाय्यक केंद्रप्रमुख डॉ.दिगंबर भोसले आणि विद्यापीठाद्वारे नियुक्त मधुकरराव पाटील खतगावकर वरिष्ठ महाविद्यालय, शंकरनगर येथील सह-केंद्रप्रमुख प्रा.जी.व्ही.पांचाळ परीक्षेचे कामकाज यशस्वीरित्या सांभाळत आहेत.
दरवर्षीप्रमाणे प्रत्येक परीक्षेत महाविद्यालयाद्वारे स्थापित अंतर्गत भरारी पथकाची यावर्षी देखील स्थापना केलेली असून या पथकातील सकाळच्या सत्रात डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ.संतोष मोरे, डॉ. शिवदास शिंदे, डॉ.शबाना दुर्राणी, प्रा. प्रियंका सिसोदिया, श्रीमती ए.बी.शिंगेवाड आणि दुपारच्या सत्रात डॉ.संजय ननवरे, डॉ.राजकुमार सोनवणे, डॉ.बालाजी भोसले, डॉ. अर्चना गिरडे, डॉ.सविता वानखेडे, श्रीमती के.पी.सावळे कार्यरत आहेत.
तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये व्ही.जी.अडबलवार, दीपक शिवणगे, गणेश शिंदे, डी.जे.पिठलेवाड, पी.एल. इबितवार, आर.सी.बासीगमलू, व्ही.पी.इंगोले, सचिन धरणे, शंकर मिरेवाड, आर.डी.खांदेजोड, एन.बी.शिंदे, एजाज शेख कार्यरत आहेत.
परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेटे, नवनाथ धुमाळ, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, डॉ. प्रवीणकुमार सेलूकर सहकार्य करीत आहेत.


