ताज्या घडामोडी

भारतीय सौंदर्यशास्त्र अधिक व्यापक करण्याची गरज -प्रा. चंचल चौहान

नांदेड :भारत हा व्यामिश्र संस्कृतींचा व भाषांचा देश आहे. भारतात अनेक धर्म, संस्कृती आणि भाषा आहेत, असा ‘अथर्ववेद’ या ग्रंथात उल्लेख आहे. ही बहुविधता जपत भारतीय सौंदर्यशास्त्र अधिक समावेशी करणे गरजेचे आहे,असे मत सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. चंचल चौहान ( नवी दिल्ली) यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलाने आयोजित केलेल्या “भारतीय सौंदर्यशास्त्र: नवे दृष्टिकोन” या
विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रातील बीजभाषण करतांना ते बोलत होते.
यावेळी मंचावर संचालक डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. वैजनाथ अनमूलवाड, डॉ. नीना गोगटे उपस्थित होते.

 

 

 

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात ते म्हणाले, युरोपमध्ये प्लेटोचा सौंदर्याचा आदर्शवादी सिद्धांत प्रश्नांकित केला. पुढे फ्रेंच राज्यक्रांतीने नव्या तत्वांचा पुरस्कार करून जगाला मिथ्या समजणाऱ्या सिद्धांताला खोडले. भारतात कवी कालिदास यांनी कुमार सम्भवन तर कवी तुलशीदास यांनी रामचरितमानस या ग्रंथामध्ये सौंदर्य हे स्थायी मूल्य नसून ते व्यक्तिनिष्ठ आहे असे मानले.
भारतात युरोपप्रमाणेच अभिजाततेतील कलाबाह्य संकल्पना बदलून अधिक समावेशी सौंदर्यशास्त्राची मांडणी होत आहे. दलित, आदिवासी आणि स्त्रियांच्या साहित्याने सौंदर्याच्या नव्या निकषाना जन्म दिला आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ( भगिनी भाव) या नव्या मूल्यांच्या आधारे नवे सौंदर्यशास्त्र घडवावे असे, मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
डॉ. भगवान फाळके ( अमरावती), डॉ. राहुल सरवटे ( अहमदाबाद), डॉ. बजरंग बिहारी तिवारी, हनुमंत भवरे ( पाबळ), डॉ. माधवी उईके ( बालाघाट), डॉ. संजय लोहोकरे ( अमरावती), डॉ. विक्रम चौधरी (सुरत) यांनी विविध सत्रामध्ये निबंध सादर केले.
भाषा संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक केले अणि चर्चासत्राचे समन्वयक डॉ. वैजनाथ अनमूलवाड यांनी चर्चासत्राच्या आयोजनाची भूमिका मांडली. डॉ. नीना गोगटे, दिगंबर नेटके, रवी तातु यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचालन केले.
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी ‘ फुले – आंबेडकरी सौंदर्यशास्त्र ‘ आणि ” भारतीय व पाश्चिमात्य सौंदर्यशास्त्र ” या विषयांवर अभ्यासक मांडणी करणार आहेत, अशी माहिती समन्वयक डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी दिली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.