‘यशवंत ‘ मध्ये विद्यार्थिनींसाठी जागरूकता कार्यक्रम उत्साहात संपन्न*

नांदेड (दिनांक ४ फेब्रुवारी २०२५)
यशवंत महाविद्यालयातील महिला सुधार व सुरक्षा समितीतर्फे पीएम:उषा योजनेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी जागरूकता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे पहिले सत्र ‘लिंग आणि स्वयंरक्षण प्रत्येकासाठी महत्त्वाचे ‘ हे होते. या सत्राच्या प्रमुख व्याख्याता सौ. दैवशाला गिरी यांनी दीपप्रज्वलन करून व्याख्यानाला सुरुवात केली. व्याख्यानाची सुरुवातच ‘साऊ पेटत मशाल, साऊ आग ती जल्हाल, साऊ शोषिंताची ढाल, साऊ मुक्तीच पाऊल … ‘ या शितल साठे या कवियत्रीच्या कवितेने केली. पुढे त्या म्हणाल्या की, लिंग ही प्रक्रिया नैसर्गिक आहे. स्त्री-पुरुषांमध्ये जो फरक केला जातो; तो आपल्या घरातूनच केला जातो, असे त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी, संस्कृती, वारसा, चालीरीती यातील स्त्री व पुरुषांवरील परिणाम सांगितले. लिंगभेद हा समाजातूनच केला जातो. लिंगभाव लिंग समानतेवरूनच येते, असेही त्या म्हणाल्या. पितृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. जेव्हा स्त्रियांवर अन्याय अत्याचार केला जातो; तेव्हा अनोळखी व्यक्तीपेक्षा जवळच्याकडूनच केला जातो, असेही त्या म्हणाल्या. लैंगिक हिंसा ही स्त्रियांवर जवळच्याच व्यक्तींकडून नेहमी होत असते. प्रमुख अतिथींनी, स्वअनुभवातून सुद्धा स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव विद्यार्थिनींना करून दिली. स्त्रियांवर जो अन्याय, अत्याचार, हिंसा होते, त्याला वाचा फोडण्यासाठी स्त्रीयांनी, मुलीनी मान खाली घालून नाही, तर ताठ मानेने जगावे, हा सल्ला दिला.
दुसऱ्या सत्रात ‘स्त्रियांचे जीवन कौशल्य व मानसिक स्वास्थ्य ‘ या विषयावर सौ.मेघा पालकर यांनी मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले. स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल व जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे तसेच विद्यार्थिनींच्या मानसिक विकासाबद्दल मार्गदर्शन करण्यावर भर दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.मंगल कदम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.मीरा फड आणि प्रा.प्रियंका सिसोदिया यांनी केले. प्रमुख अतिथिंचा परिचय डॉ.नीताराणी जयस्वाल आणि डॉ.रत्नमाला मस्के यांनी करून दिला.
अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी केला. शेवटी आभार प्रा.भारती सुवर्णकार मानले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती तसेच डॉ. पद्माराणी राव, डॉ. अर्चना गिरडे, डॉ. संगीता शिंदे (ढेंगळे), प्रा. संगीता चाटी,डॉ. कविता केंद्रे, डॉ.एस.एम. दुर्राणी, डॉ. सविता वानखेडे, प्रा. राजश्री भोपाळे, प्रा. वाकोडे,डॉ. दीप्ती तोटावार, प्रा.धोपटे, प्रा.सावंत, डॉ. अंजली जाधव आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, समन्वयिका डॉ.मंगल कदम, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.