नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रात संशोधन व रोजगाराच्या नवनवीन संधी -डॉ.काशिनाथ बोगले

नांदेड:( दि.४ फेब्रुवारी २०२५)
यशवंत महाविद्यालयात पीएम -उषा योजनेअंतर्गत इनोव्हेशन व्याख्यानमालेअंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.काशिनाथ बोगले, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे “इंनोवेशन इन मटेरियल सायन्सेस ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानाच्या अध्यक्षपदी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए. बशीर होते. याप्रसंगी विचारमंचावर व्याख्याते डॉ.काशिनाथ बोगले व व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संभाजी वर्ताळे उपस्थित होते .
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.संभाजी वर्ताळे यांनी केले.त्यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेचा उद्देश सांगितला व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
व्याख्याते डॉ. बोगले यांनी, विद्यार्थ्यांना मटेरियल सायन्समधील संशोधन, नॅनो टेक्नॉलॉजी या क्षेत्रात होत असलेले नवनवीन संशोधन तसेच भविष्यातील संधिविषयी मार्गदर्शन केले. संशोधनात चिकाटी व सातत्य ठेवल्यास जीवनात खूप मोठ्या प्रमाणात करियरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याची अनेक उदाहरणे दिली.
अध्यक्षीय समारोपात डॉ.एम. ए. बसीर यांनी, रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना असलेल्या संधी याविषयी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन डॉ.डी.एस. कवळे यांनी केले तर आभार डॉ.संदीप खानसोळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुभाष जुन्ने, डॉ. विजय भोसले, डॉ.शिवराज शिरसाट, डॉ. कविता केंद्रे, डॉ.दत्ता कवळे, डॉ. मदन आंबोरे, डॉ .अनिल कुवर, प्रा.शांतूलाल मावसकर, डॉ.निलेश चव्हाण , प्रा.संतोष राऊत व प्रा. स्नेहलकुमार पाटील, ए. जी. चंदेल, विठ्ठल इंगोले,के.एस.इंगोले, श्री.साखरे ,श्री. बतलवाड यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ. अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.