स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ज्ञान स्त्रोत वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचे उद्घाटन संपन्न
प्रतिनिधी:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते संपन्न झाले हा उपक्रम एक जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या काळात राबविला जाणार आहे, या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर कुलसचिव डॉ. डी.डी. पवार अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. एम के पाटील अधिष्ठाता आंतरविद्या शाखा डॉ. चंद्रकांत बाविस्कर डॉक्टर पृथ्वीराज तौर. डॉ. योगिनी सातारकर डॉक्टर मल्लिकार्जुन करजगी डॉ. सुहास पाठक डॉ. अशोक कदम, तानाजी हुस्सेकर, डॉ. पी विठ्ठल, डॉ.वैजनाथ अनमुलवाड, डॉ. जगदीश कुलकर्णी ,डॉ. अरुण हंबर्डे ,विठ्ठल मोरे ,संदीप डहाळे आदींची उपस्थिती होती