ताज्या घडामोडी

मुक्त विद्यापीठ “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अभियान राबविणार

नांदेड(प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर, डॉ. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षेतेखाली व मा. प्र. कुलगुरु, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन अभियान प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” व स्कुल कनेक्ट 2.0 प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक 01 ते 15 जानेवारी 2025 या पंधरवडा मध्ये विभागीय केंद्र, नांदेड अंतर्गत लातुर, हिंगोली, परभणी, नांदेड या चार जिल्ह्यात मध्ये राबविण्यात येणार असुन प्रत्येक जिल्हयांकरीता जिल्हाप्रमुख व प्रत्येक जिल्हयातील जिल्हाप्रमुखांना मदतनीस म्हणुन 10 समन्वयक नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विभागीय वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी दिली.

शैक्षणिक बदलांबाबत व्यापक जनजागृती करणे, विशेषत: इयत्ता नववी ते बारावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आमुलाग्र बदल होण्याकरीता राबविण्यात येणार असून नवीन शैक्षणिक धोरणानुसार विविध अभ्यासक्रम, रोजगार, विद्यार्थ्याकरीता उपलब्ध शिष्यवृत्ती, कौशल्य आधारीत शिक्षणाची माहिती, बहुविद्याशाखेय लवचिक अभ्यासक्रम, आणि स्वंयरोजगाराच्या विविध संधीची माहिती स्कुल कनेक्ट 2.0 व वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

वाचन संस्कृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा व्यतीरीक्त आवडीचे पुस्तक निवडुन पुस्तकांचे परीक्षण, पुस्तकांचा विद्यार्थ्यावर झालेला परीणाम निबंध रुपी व समीक्षा टिपण सादर करावयाचे आहे. विभागीय स्तरावर व राज्यस्तरावरील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक यांना पारीतोषक व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकांनद यांच्या जयंती निमीत्त वाचन दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असुन त्यामध्ये सलग 12 तास / 18 तास / 24 तास वाचन करण्याकरीता युवक व युवती यांनी वरील विविध कार्यक्रमाकरीता मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. यशवंत कलेपवार यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.