नेताजी सुभाष विद्यालयामध्ये तालूकास्तरीय स्काऊट गाईडचे उजळणी वर्ग संपन्न

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये मानवत तालूकास्तरीय स्काऊट गाईड उजळणी वर्ग घेण्यात आले.
परभणी भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी मानवत तालुकास्तरीय एक दिवसीय कब मास्टर, flock लीडर, स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन तसेच अप्रशिक्षित शिक्षकांकरिता एक दिवसीय उजळणी वर्ग/ चर्चासत्राचे आयोजन नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये घेण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.उद्धवरावजी हरकाळ पाटील हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.शिवराज नाईक , विद्यालयाचे पर्यवेक्षक आणि जिल्हा स्काऊट गाईड प्रशिक्षण आयुक्त श्री.विश्वनाथ बुधवंत , गाईड कॅप्टन सौ कुसुमताई कनकुटे मॅडम, केंद्र प्रमुख ओमप्रकाश मुळे सर, कोल्हा मुख्याध्यापक मोकरे सर उक्कलगाव मुख्याध्यापिका सौ मायाताई गायकवाड मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यशाळेची सुरुवात स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, व स्काऊट गाईड प्रार्थनेने सुरूवात करण्यात आली, सदरील कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा संघटक स्काऊट श्री मिलिंद तायडे, जिल्हा संघटक गाईड श्रीमती माधुरी जवणे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्रीमती नाजिया शेख मॅडम,कार्यालय लिपिक श्री दीपक पंडित यांनी उपस्थित शिक्षकांना यथोचित मार्गदर्शन केले. कार्यशाळेला गटसाधन केंद्रातील मानवत केंद्रप्रमुख शिक्षक श्री, ओमप्रकाश मुळे सर आणि जि प.कोल्हा येथील मुख्याध्यापक श्री मोकरे सर यांनी आपल्या मनोगतात स्काऊट गाईड मुळे शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो,आजच्या काळात स्काऊट गाईड चळवळीची खूप आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. तर जिल्हा स्काऊट संघटक श्री मिलिंद तायडे यांनी उपस्थित शिक्षकांना नोंदणी बाबत सूचित केले, कार्यशाळेमध्ये नोंदणी, ऑनलाइन नोंदणी, या प्रमाणे तीन वर्षाचा अभ्यासक्रम,तृतीय सोपान प्रमाणपत्र, राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, खरी कमाई, जिल्हा मेळावा, राज्य मेळावा,जांबोरी, इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला तालुक्यातील उत्स्फूर्त बहुसंख्य शिक्षकांची उपस्थिती लाभली.तसेच विद्यालयातील स्काऊट गाईडचे विद्यार्थी उपस्थीत होते कार्यशाळेला जिल्हा कार्यालयाचे लिपिक श्री दीपक पंडित यांचे यांचे या वेळी मोलाचे सहकार्य लाभले तर यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मा.श्री. विश्वनाथ बुधवंत यांनी केले तर तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्रीमती कूसूमताई कणकूटे यांनी मानले.
****