ताज्या घडामोडी

मानवत येथील शासकीय विश्राम गृहावर लहूजी साळवे बहूजन क्रांन्ति सेनेची महत्वाची बैठक संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील शासकीय विश्रामगृह वर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेची मानवत तालुकास्तरीय महत्वाची बैठक संपन्न झाली.
सविस्तर वृत्त असे की,
आज मानवत येथे शासकीय विश्राम गृहावर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेची मानवत तालुकास्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष मा राधाजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष मा. गणेश घोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रा अंकुश कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या महत्वपूर्ण तालूकास्तरीय बैठकीमध्ये लोहरा ग्रामपंचायत सदस्य मा गोपीनाथ गायकवाड यांची परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून मानवत येथे लोकशाहिर, साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
लोकशाहीर, साहित्य रत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी देऊन देशी व विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवण्यात यावी व 18 जुलै त्यांचा स्मृतिदिन संघर्ष दिन म्हणून महाराष्ट्र शासनाने साजरा करावा मानवत येथील शहरात अण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे यांचे पूर्ण कृती पुतळे बसविण्यात यावे या व इतर विषयावर संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष अंकुश कांबळे यांनी मार्गदर्शन केले तसेच संघटन वाढीच्या दृष्टीने जिल्हाध्यक्ष गणेश घोडे यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ गायकवाड यांनी केले तर संघटनेचे मानवत तालुकाध्यक्ष बळीराम गायकवाड यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी बैठक यशस्वी करण्यासाठी दादाराव कांबळे माजी सरपंच खरबा दत्ता वाघमारे मारुती गायकवाड व अशोक गायकवाड यांनी परिश्रम घेतले

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.