ताज्या घडामोडी

अदित्य पार्क मधील प्रलंबीत रस्त्याचे *डाॅ. अकूंशराव लाड यांच्या हस्ते उद्घाटन.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेच्या परिक्षेत्रातील आदित्य पार्क मधील आई इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना यापुढे रस्त्याचा त्रास होणार नाही. कारण आज आदित्य पार्क मधील प्रलंबित रस्त्याचे भूमिपूजन डाॅ. अकूंशराव लाड यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता खराब अवस्थेत होता. आदित्य पार्कमधील नागरिकासह आई इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना या रस्त्यामूळे मोठा त्रास होत होता.
डाॅ. अकूंशराव लाड यांच्या प्रयत्नामूळे मोठा निधी खेचून आणून रस्त्यासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. या परिसरामध्ये स्थानिक रहिवासी, शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत या विकास कामाचे उदघाटन करण्यात आली.
जेणे करून पावसाळ्यात तसेच पुढील काळात नागरिकांना याचा त्रास होणार नाही.
या वेळी किरण बारहाते, राम घटे, मुक्तीराम गोरे, श्री.सोनकांबळे, लोखंडे सर, गिरी सर, गुंजे सर, ठाकूर मॅडम, अतकरे मॅडम यावेळी उपस्थित होते.

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.