https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

पंधरा दिवसीय पर्यावरण अभियान *जमाते इस्लामी हिंद* मानवतच्या कार्याला सहकार्य करणार मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर पालिका पंधरा दिवसीय पर्यावरण अभियान *जमाते इस्लामी हिंद* मानवत शहरात राबवत आहे.
या पर्यावरण अभियानाच्या निमित्ताने नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देणे आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे ह्या उद्देशाने मानवत नगर पालिका सहकार्य करण्याचे निवेदन दिनांक २७ जुन गुरूवार रोजी मूख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांना देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
० पर्यावरण शिक्षण :- स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
० स्वच्छता मोहीम :- सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, उद्याने आणि जलाशयांची स्वच्छता करण्यासाठी स्वयंसेवकांचे संघ तयार करणे.
० वृक्षारोपण :- पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नगर पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे.
० कचरा व्यवस्थापन :- कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्नवीनीकरणाबाबत जनजागृती करणे.
० प्रदूषण नियंत्रण :- वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी करणे. यावेळी मानवत नगर पालिका या पर्यावरण अभियानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी दिले तसेच
यावेळी नागरिकांनी या पर्यावरण संवर्धन अभियाना मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा असे आवाहन मूख्याधिकारी कोमल सावरे यांनी केले. जेणेकरून पर्यावरण संवर्धन अभियान यशस्वी होईल आणि मानवतकरांचे पर्यावरणीय आरोग्य सुधारेल.
हे निवेदन मा.मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी स्वीकारले.
निवेदनावर *जमात ए इस्लामी हिंद* मानवतचे पदाधिकारी सलीम बागवान, नजात पठाण, लतीफ हाफेज , मौलाना असलम, समीर शेख, मुश्ताक शेख, सरफराज सय्यद , एकबाल सय्यद , फय्याज अन्सारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704