ताज्या घडामोडी

नवतरूणांच्या प्रयत्नाने वृक्षांना जलसंजीवणी.

मानवत येथील ईदगाह परिसरातील वृक्षांना जगविण्यासाठी पर्यावरण प्रेमी यूवकांची धडपड

मानवत/ प्रतिनिधी

सध्या वातावरणातील बदल आणि वाढते तापमान, पावसाची अनिश्चितता , वातावरणातील ‘ग्लोबल वार्मिंग’ची झळ सर्वांनाच सोसावी लागत आहे. तर तापमानाने उच्चाक गाठला असुन जिल्हयाचे तापमान ४५ % अंश सेल्सियस पर्यत पोहचले आहे. याची गंभीर दखल घेत मानवत शहरातील पर्यावरण प्रिय युवकांनी मानवत शहरातील उक्कलगाव रोड वरिल मोठी ईदगाह मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करुन त्याचे संवर्धन करण्यासाठी आप आपल्या वेळा प्रमाणे परिसरातील वृक्षांना दररोज सायंकाळी पाणी देण्यासाठी सरसावले आहे.
ईदगाह मैदान परिसरात लिंब जांभुळ बदाम यासह विविध प्रकारची वृक्ष लावून संगोपान करीत आहेत. या परिसरातील वृक्षांना ही पाण्याची आवश्यकता भासत होती. यासाठी मानवत शहरातील युवकांनी पर्यावरणाची गरज लक्षात घेता पवित्र रमजान महिन्यांमध्ये शहरातील युवकांनी या परिसरात असलेल्या वृक्षांना दररोज पाणी देण्याचा निर्णय केला होता. गेल्या दोन महिन्यापासून या परिसरातील वृक्षांना पाणी देत आहेत. जमिनीची धूप होऊ नये व पाण्याचे बाष्पिभवन होऊ नये यासाठी झाडाखाली पाण्याच्या ओलावा सतत असावा म्हणून सर्व वृक्षांच्या बूडाशी गव्हाचा भुसा अंथरून कडक उन्हापासून वृक्षांच्या मूळ्याचे संरक्षण करण्यात आले आहे.
इदगाह परिसरात असलेल्या या वृक्षांना दररोज पाणी मिळत असल्यामुळे वृक्ष ऐन कडक उन्हात बहरले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परिसरातील हिरवेगार वृक्ष मस्तपणे डोलत आहे. शहरातील युवकांनी पर्यावरण रक्षणामध्ये सहभाग नोंदवून सामाजीक कार्याबद्दल शहरातील युवकांच्या सामाजीक कार्याची दखल घेत परिसरातील सुजान नागरीक अभिनंदन करून कार्याचे कौतूक करीत आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.