बालकलाकारांच्या न्यृत्यकला अविष्कारामूळे ग्रामस्थ झाले मंत्रमृग्ध.
देवलगाव आवचार जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन उत्सहात साजरे. <

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौजे देवलगाव आवचार येथे दिनांक २१ मार्च रोजी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी कार्यक्रमाचे उदघाटन परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री. विठ्ठलजी भुसारे, यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री. सतिशजी कांबळे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर आवचार, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर नाना घाटूळ, श्री. दत्तरावजी शेळके तालुका अध्यक्ष रयत क्रांती संघटना सेलु, युवा शिवसैनिक श्री
वसंतदादा जोगदंड, गावचे कर्तव्य दक्ष सरपंच श्री. केशवराव आवचार, उप सरपंच श्री. शुभम आवचार, पोलीस पाटील माणिकराव जाधव, यांची उपस्थिती होती. तसेच ज्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ते श्री. दशरथ मुंढे, मानवत व सावरगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सर्वाचे मार्गदर्शक श्री. शिरिषजी लोहट यांनी उत्तम प्रकारे आभार प्रदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. दत्तराव आवचार, ज्या विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलनात भाग घेतला व आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली, तसेच, आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी आलेल्या प्रंचड पालकांचे, ज्यांनी या कलागुणांना आकार देण्याचे काम केले ते फोटोग्राफर श्री सोहम खिल्लारे, ज्यांची उत्कृष्ट अशी लाईट डेकोरेशन केले ते गावचे श्री राजू भैया उर्फ माणिकराव आवचार, फोटो ग्राफर व आलेल्या तमाम शिक्षण प्रेमी व नागरीकांचे व ज्यांनी ज्यांनी नकळत मदत केली, व सर्व कार्यक्रम व्यवस्थित शांततेत पार पाडण्यासाठी
मदत केली अशा सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अयोध्या मधुकर आवचार व शाळेतील मुख्याध्यापक श्री. दिपक पंडित सर, श्री. विनोद गायकवाड श्री. शिवाजी राखुंडे, श्रीमती रत्नमाला जिवने, श्रीमती शारदा सोनवणे, श्री. नामदेव हजारे, मुंजाजी जाधव, प्रितम पारसेवार राहुल ढगे सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेभाऊ आवचार, पांडुरंग आवचार जनार्दन आवचार सुरेखाताई जाधव,राजु येसकर, वर्षा परमेश्वर आवचार, गोकर्णा गोविंद आवचार, अनुसया आवचार, निता बनसोडे, पांचाळ ताई, मुंजाजी आवचार, शाळेचे मुख्याध्यापक दिपक पंडित, यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
***