https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

पाथरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण पाथरी येथे संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

परभणी लोकसभा व 98 पाथरी विधानसभा अंतर्गत १८७७ निवडणूक केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रथम प्रशिक्षणासाठी एकुण १९ मतदान यंत्र हाताळणी कक्ष स्थापन करून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले या सर्व प्रशिक्षण कक्षात सकाळ व दुपार सत्राला ५० निवडणूक अधिकारी कर्मचारी यांचे गट तयार करून मतदान यंत्र हाताळणी ‘ मॉकपोल व सिलींग बाबतची माहीती नियुक्त मास्टर ट्रेनर यांनी सविस्तर रित्या माहिती दिली
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी व तहसिलदार मानवत तथा प्रशिक्षण नियंत्रण अधिकारी पांडूरंग माचेवाड यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली
दरम्यान लोकसभा निवडणूक प्रथम प्रशिक्षणादरम्यान दोन सत्रात मतदान प्रक्रीया हाताळणीची माहीती पीपीटी ०दारे मानवत तहसिलचे तहसिलदार पांडूरंग माचेवाड यांनी दिली तर मतदान यंत्र कंट्रोल युनिट बॅलेट युनिट व्हि०हिपॅट हाताळणी व सिलींग कशा प्रकारे मतदान केंद्रावर करावी त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक एम .एस. सोनवळकर विलास मीटकरी व किशोर तुपसागर यांनी दाखवले
निवडणूक प्रक्रीया पारदर्शक पणे पूर्ण करण्यासाठी सर्व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी काळजीपूर्वक काम करावे व सर्व प्रपत्रे अचुक भरावेत असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले सकाळी ९ ते १ व दुपारी २ते ५ दोन सत्रात नियुक्त निवडणूक अधिकारी / कर्मचारी यांनी ऊपस्थीत राहून प्रशिक्षण घेतले
दुसरे प्रशिक्षण १६ एप्रील रोजी प्रत्येक विधान सभा मुख्यालयी दीले जाणार आहे
प्रशिक्षण नियोजन पुर्ण करण्यासाठी तहसिलदार पाथरी हांदेशवार ‘ सोनपेठ चे तहसीलदार सुनिल कावरखे यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर तहसिलदार रणजित सिंह कोळेकर ‘ नायब तहिसलदार महाजन व जिवन धारासूरकर आणि पाथरी तहसिलचे निवडणूक विभाग चे श्री अन्नपुरे यांनी चोख प्रशिक्षण व्यवस्था करण्यात आली होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704