https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

परतीच्या प्रवासामूळे एस.टी.ला माय,माऊल्या सह लेकूरवाळ्यांची तोबा गर्दी* *जादा बसेस सोडण्याची सामान्य प्रवाशांतून मागणी.

मानवत // प्रतिनिधी.

दिवाळी निमित्त परतीचा प्रवास ; एस. टी. बसला प्रवाशांची गर्दी दिवाळी होऊन दोन दिवस लोटले असता आता दिवाळी निमित्त गावी आलेल्या माय माऊल्या सह लेकूरवाळ्या लेकींसह बाहेरगावी राहत असलेल्यांच्या परतीचा प्रवाशी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून बसस्थानक प्रवांशांनी खचाखच्च भरले आहेत तर गाड्यांना तोबा गर्दी पाहावयास मिळत आहे.
दिपावली निमित्त गावाकडे आलेल्या नागरीकांसह माय माऊल्या ह्या आपल्या माहेरी आल्या होत्या दिपावली संपली असून सर्वजन गावाकडून परतीच्या प्रवासाकडे निघाल्या असून त्यामूळे सद्या राज्य मार्ग परिवहन मंडळाचा एस. टी. बसला तोबा गर्दी होताना दिसत आहे.
राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात हंगामी १० टक्के जरी वाढ केली असली तरी लेकूरवाळ्या माय माऊल्या व सुज्ञ प्रवाशी वर्ग एस. टी. प्रवासाला पसंती देत असल्याचे दिसत आहे. वर्षातील सर्वात मोठा सण उत्सव समजल्या जाणाऱ्या दिवाळी सणास मोठया प्रमाणात नागरिक गावी येत असतात त्यामुळे बसला मोठी गर्दी होत होताना दिसत आहे. याकडे रापमने लक्ष देऊन *बहूजन हिताय, बहूजन सुखाय,* या आपल्या ब्रीद वाक्याकडे लक्ष देऊन गाड्यांच्या संखेत वाढ करावी अशी मागणी प्रवाशांमधून होतांना दिसत आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704