https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कोल्हा ते रूढी रस्त्यावरील धन दांडग्याचे अतिक्रमण तात्काळ काढाशेकडो शेतकऱ्यांची मानवत तहसीलदार यांच्याकडे मागणी

१५ दिवसात रस्ता मोकळा न केल्यास ; उपोषण करण्याचा कोल्हावाशीयांचा ईशारा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील कोल्हा ते रूढी रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून तो रस्ता रहदारीस शेतकऱ्यांना खूला करून देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने मानवत तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, मानवत तालुक्यातील कोल्हा ते रूढी हा रस्ता गेली अनेक वर्षांपासून सुरु आहे. सदरील रस्ता हा ३३ फुट रुंदीचा असून या रस्त्यावर अनेक धनदांडग्यानी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हा रस्ता रहदारीस केवळ ५ ते ६ फूट राहिला आहे. या रस्त्या लगत अनेक शेतकऱ्यांची शेती असून शेती कामासाठी लागणारे वाहने व बैलगाडी नेण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्या मुळे या रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे व रस्ता रहदारीस १५ दिवसाचे आत मोकळा करावा अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल असा ईशारा एका निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर प्रा. डॉ. रामचंद्र भिसे पाटील , सुरेशराव भिसे पाटील , दत्ता भिसे पाटील, अर्जुन ढाकरगे, गजानन संसारे, शेख रसूल, दिलीप भिसे, प्रकाश संसारे, दिपक भिसे, दिनेश भिसे, रामभाऊ भिसे, सचिन भिसे, रामेश्वर भिसे, सिद्धेश्वर भिसे, गजानन भिसे, विठ्ठल भिसे, अनुराग भिसे, छगन तारे, आश्रोबा लोणकर, सुरेश भिसे, केशव भिसे, गोविंद पौळ, नारायण भिसे, बालासाहेब भिसे, सखाराम भिसे, सुनील बोराडे, रामराव देशमुख,अशोक संसारे, सिद्धेश्वर ढाकरगे, गोपाळ ढाकरगे, अर्जुन हारकळ, अर्जुन ढाकरगे, जगन भिसे, गणेश ढाकरगे, गजानन भिसे, राहुल देशमुख यांच्या सह या भागातील त्रस्त शेतकऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704