बार्टीच्या रमाई संशोधन प्रकल्पासाठी सिध्दार्थ तलवारे यांची तज्ञ मार्गदर्शकपदी नियुक्ती

*नांदेड प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे अर्थात बार्टीच्या त्याग मुर्ती माता रमाई यांच्या जीवनावर ऐतिहासिक संशोधन प्रकल्पासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा रमाईच्या जीवनावर मराठी साहित्यातील देशातील पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करणारे अभ्यासक सिध्दार्थ तलवारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बार्टीच्या महासंचालक यांनी नुकतेच तसे पत्र दिले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने अनुसूचित जातीतील विविध घटकांचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक संशोधन केल्या जाते सद्या बार्टी च्या वतीने माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा ऐतिहासिक संशोधन प्रकल्प सुरू आहे, या प्रकल्पासाठी सिध्दार्थ तलवारे यांची तज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाली आहे.या प्रकल्पासाठी क्षेत्रभेटी तसेच विविध संदर्भ ग्रंथांचा आढावा घ्यायचा आहे.प्रकल्प दर्जेदार होईल यासाठी कार्य करावयाचे आहे, तलवारे यांच्या या नियुक्तीचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
—————————