https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वा.रा. ती. म.विद्यापीठातील प्र -कुलगुरू पद अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातून नियुक्त करण्यासंदर्भात कुलूगुरूंचा सकारात्मक प्रतिसाद त्यामुळे तूर्तास आत्मदहन आंदोलनास स्थगिती.

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना होऊन जवळपास तीस वर्षाचा कालावधी उलटला असून अद्याप पर्यंत अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवाराची कुलगुरू पदी नियुक्ती करण्यात आली नाही. किमान प्र -कुलगुरू पदी अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गाचा उमेदवार नियुक्त करण्यात यावा याबाबत नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन चे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी विद्यापीठासमोर बुधवार दिनांक 6 मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
सायंकाळी कुलगुरू दालनात विविध समविचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत प्र -कुलगुरू पदी किंवा अन्य पदी उमेदवार नियुक्त करताना अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारांना संधी देण्या संदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल असे कुलगुरू डॉ. चासकर यांनी सांगितले.
तसेच डॉ.राजपालसिंह चिखलीकर यांनी आत्मदहन करू नये याबाबत पराव्रत करण्यात आले.या प्रकरणात घटनेचे शिल्पकार प पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु खुद्द मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांनी गंभीर दाखल घेऊन कुलगुरू डॉ चासकर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून या घटनेची तात्काळ दाखल घेण्यास सांगितले.
कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या दालनात सायंकाळी विविध प्राध्यापक संघटना आणि विद्यार्थी संघटना यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये रिपब्लिकन सेना(आनंदराज आंबेडकर ) प्रा. गौतम दुथडे,महाराष्ट्र ऑल बहुजन टीचर्स असोसिएशन नांदेड( माप्ट)सद्यशोधक समाज प्रतिष्ठान, नांदेड,महाराष्ट्र प्राध्यापक सेना,संशोधक विद्यार्थी कृती समिती,भारतीय पिछडा संघटना(प्राध्यापक विंग ) भारतीय स्टुडंट फेडरेशन, न.सो स.वाय.फ, व रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशन इत्यादी संघटनांनी लवकरच विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना संधी देण्यात यावी बाबत चर्चा झाली . विद्यापीठ प्रशासनाने सदरील मागणी मान्य न झाल्यास प्राध्यापक संघटना आणि समविचारी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुढील तीव्र आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असा एकमतानी निर्णय घेण्यात आला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704