दहावी सीबीएसई परीक्षेत कु. अनुष्का मुठ्ठे चे सुयश

नांदेड :
नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या निकालात नागार्जुना पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी कु. अनुष्का अजय मुठ्ठे हिने बाजी मारत 96.80% इतके उत्तम गुण प्राप्त करत सुयश मिळवले. सुरवाती पासूनच अतिशय नियोजित अभ्यास करत तिने हे यश मिळविले. अतिशय शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्ती असलेल्यास अनुष्काने अगदी प्राथमिक शिक्षणापासूनच प्रत्येक इयत्तेमध्ये अभ्यासात गुणवत्तेची चुणूक दाखवत यशस्वी वाटचाल केली आहे.नागार्जुना शाळेची गुणवत्तापूर्ण शिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन , आई वडिलांचे कष्ट, नियमित आणि नियोजन पूर्वक अभ्यास या सर्व गोष्टीना यशाचे श्रेय जाते अशी भावना तिने व्यक्त केली.अनुष्काने पुढे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा मनोदय व्यक्त केला. नागार्जुना पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापिका शैला पवार, श्री केशव गड्डम सर्व, अनुपल मॅडम, मनीषा मॅडम, पी. के. जाधव सर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर, अनिकेत पाटील गवते, हर्षद पाटील गवते, मित्र आणि नातेवाईकांनी या यशाबद्दल अनुष्काचे कौतुक आणि अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.