ताज्या घडामोडी
मानवत तालूक्यात सर्वदूर ढगांच्या गडगडाटा सह पावसाची हजेरी.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील जिल्हा परिषद मतदार संघातील गावा मध्ये आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामूळे जन जिवन विस्कळीत झाले.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूक्यात आज सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान वातावरणातील बदलामूळे अवकाळी वादळी वारे व पाऊसाने हजेरी लावल्याने जन जिवन विस्कळीत झाले .तर विज वितरण कंपनीने खबरदारी घेत आपला विद्यूत पूरवठा खंडीत केला.
अचानक सोसायट्याचे वारे वाहू लागले त्यामूळे अनेकांचे नूकसान झाले तर अचानक अवकाळी पाऊस सूरू झाल्यामूळे ग्रामिण जनतेची दाणादान उडाली तर अचानक पडलेल्या पावसामूळे जनजिवन विस्कळीत झाले.
विजेच्या गडगडाटा मूळे नागरिक भेयभित झाले असून तालूक्यात कोणतीही अनूचित घटना घडली नसल्याचे नागरिकांतून मत व्यक्त केल्या जात आहे.
*