डॉ. नितीन देशमुख यांचा आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये सहभाग

——————————————
अहमदपूर :- येथील महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर मधील प्रा.डॉ. नितीन देशमुख हे अबू धाबी विद्यापीठ, दुबई येथे आयोजित दि.23 ते 24 मे 2025 रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होऊन रिसर्च पेपर वाचन करणार आहेत.
या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषचे आयोजन अबू धाबी विद्यापीठ, दुबई, दिगंबर बिंदू महाविद्यालय, भोकर जि. नांदेड व निजावा विद्यापीठ, ओमान यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. “ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. सदरील परिषेदेसाठी प्रा.डॉ. नितीन देशमुख यांच्या रिसर्च पेपरची निवड करण्यात आली. त्यांनी “Typology of market centers in Yavatmal District:A Geographical Analysis” या विषयावर आपला रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये सादर केला आहे.
प्रा.डॉ. नितीन देशमुख हे अबू धाबी विद्यापीठ, दुबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये सहभाग होत असल्यामुळे त्यांना विचार विकास मंडळ या संस्थेचे अध्यक्ष अँड. काशिनाथ बेंडकुळे, उपाध्यक्ष विजय कुमार देशमुख, उपाध्यक्ष युवराज पाटील सचिव अँड. प्रल्हाद कदम, उपसचिव अँड.वसंतराव फड, उपसचिव सुरेश देशमुख, कोषाध्यक्ष रामचंद्र शेळके महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी शेळके, क्रिडा संचालक मुंबई विद्यापीठ डॉ. मनोज रेड्डी, कार्यालयीन अध्यक्ष दिनेश गाजरे,
डॉ.डी.जी.माने, डॉ. एस. एन. गोंड, डॉ. बी. टी. पाटील, डॉ. वी. आर. राठोड, डॉ. जी. एल. गायकवाड, डॉ. एन. एस. मगर, प्रा. एस. के. गायकवाड, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी शुभेच्छा दिल्या.