स्वाभिमानीच्या वतीने मंगरूळ पाटीवर ऊस वाहतूक रोखत दोन्ही साखर कारखान्याचा कार्यालयास ठोकले टाळे
मानवत / प्रतिनिधी.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्याच्या वतीने ०८ जानेवारी रोजी मंगरूळ पाटी येथे ऊस वाहतूकीचे ट्रॅक्टर रोखत संतप्त भूमिका घेऊन ट्वेंटीवन शुगर्स लिमि टेड सोनपेठ, गंगाखेड आणि श्री. लक्ष्मी नृसिंह शुगर्स एल. एल. पी. या दोन्ही शेतकी विभागीय कार्यालयास टाळे ठोकत मंगरूळ पाटीवर ऊस वाहतूक ठप्प करण्यात आली शेतक ऱ्यांची ऑक्टोबर महिन्याची नोंद अस ताना सुद्धा शेअर्स अनामत रक्कम पन्नास हजार रुपये असताना ही ऊस नेण्यास सदरील कारखाना टाळा टाळ करत आहे. जो पर्यंत शेतकऱ्याला ऊस तोड भेटणार नाही तोपर्यंत इथून एक ही ऊस वाहतूक करणारे वाहन हलणार नाही अशी भूमिकाच या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी घेत तब्बल अर्धा ते एक तास ऊस वाहतूक रोखण्यात आली होती यावेळी स्वाभि मानी शेतकरी संघटनेचे मानवत तालुकाध्यक्ष विठ्ठल चोखट, युवा तालुकाध्यक्ष दत्तराव परांडे, ज्ञानोबा चौखट, बाळासाहेब चौखट, गोविंद जाधव, दिपक चौखट, दसरथ सगरे बालासाहेब चौखट, बाबासाहेब चौखट यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.
***