ताज्या बातम्या

डॉ.संतोष शेंबाळे यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार जाहीर…

प्रतिनिधी;महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा – राज्यस्तरीय स्पर्धा 2022-23 अंतर्गत विविध विभागात दिले जाणारे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत.या मध्ये उत्कृष्ट ठरले ते डॉ. संतोष शेंबाळे हे …

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या करियर विकासासाठी गेल्या एक वर्षापासून अविरत यशस्वीरित्या ग्रामीण विद्यार्थ्यांचे करियर विषयी विषय घडविणाऱ्या ज्योतिबा फुले महाविद्यालयात या विभागात कार्यरत असलेले आणि करियर कट्ट्याचे नांदेड जिल्हा ग्रामीण समन्वयक डॉ.संतोष शेंबाळे यांच्या विद्यार्थीभिमुख कार्यातून मुखेड भागातील असंख्य ग्रामीण विद्यार्थी करियर बाबत जागरूक झाले आणि असंख्य विद्यार्थी यशस्वी सुद्धा झाले यांच्या या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल आणि योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट करियर कट्टा जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्कार जाहीर झाला. त्यासाठी राज्याची करिअर कट्टा प्रमुख आदरणीय यशवंत शितोळे सर आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य एस बी अडकिने सरांनी, श्री श्रीकांत पाटील विश्वनाथ पाटील हंगरगेकर ओमकार आप्पा स्वामी शिवराज पाटील हंगरगेकर रंजीत पाटील हंगरगेकर शिवपुजे साहेब श्रीमान कुलकर्णी साहेब श्रीमान वंजे साहेब इत्यादीनी डॉक्टर संतोष शेंबाळे यांचे विशेष अभिनंदन, कौतुक आणि सत्कार केले..
डॉक्टर संतोष शेंबाळे हे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात गेल्या दीड वर्षापासून करिअर कट्टा केंद्र आदरणीय प्राचार्य सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून मुखेड भागातील 5000 विद्यार्थ्यांना नोकऱ्यांच्या जाहिराती, दर्जेदार नोट्स आणि मार्गदर्शन गेल्या कित्येक दिवसापासून करत होते. मुखेड भागातील असंख्य गरजू,गरीब आणि गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी सुद्धा झाले. डॉक्टर संतोष शेंबाळे हे नांदेड जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये सेमिनार घेऊन करियर कट्टा विषयी मोठी चळवळ तयार केली ज्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थी करिअर विषयी सकारात्मक दृष्टी तयार करण्यामध्ये आणि करियर हा विद्यार्थ्यांचा केंद्रबिंदू असतो हे रुजवण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे करियर कट्टा केंद्र संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाले.
प्राचार्य साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्योतिबा फुले महाविद्यालयात गेल्या एक वर्षात IAS तुमच्या भेटीला आणि उद्योजक तुमच्या भेटीला, बारावी नंतर काय?
यूपीएससी संबंधित कार्यशाळा, विविध करिअर विषयी महत्वाचे वेबिनार आयोजन तसेच कॅम्पस इंटरव्यू यापासून असंख्य विद्यार्थी करिअर बाबत संपूर्ण मुखेड भागातील गावागाड्यात मोठ्या प्रमाणात असंख्य विद्यार्थी जागरूक झाली असंख्य विद्यार्थी यशस्वी सुद्धा झाले यामध्ये डॉक्टर संतोष शेंबाळे सरांचे विशेष योगदान, कष्ट आणि नवीन व्हिजन यांचा खारीचा वाटा होता.
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय संपूर्ण नांदेड जिल्ह्यात करिअरचे उत्कृष्ट ग्रामीण संकुल म्हणून नावावर उपास आले. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात सामाजिक आणि आर्थिक जेमतेम परिस्थिती असलेले असंख्य विद्यार्थी आहेत या सर्वांमध्ये करियर कट्टा विषयी विशेष आवड निर्माण करण्यामध्ये खर्च करिअर कट्टा केंद्र महाविद्यालय आणि प्राचार्य यांची आदर्श अशी ओळख तयार झाली.

डॉक्टर संतोष शेंबाळे यांनी या यशाचे श्रेय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस बी अडकिने सर, मान्यवर संचालक मंडळ तसेंच आदरणीय यशवंत शितोळे सर, mjpm परिवार, विभागीय करियर कट्टा समन्वयक डॉ.एस बी चव्हाण सर, डॉक्टर पी आर मुट्ठे सर ( यशवंत महाविद्यालय, नांदेड ), तसेच डॉक्टर श्रीकांत देशमुख सर तसेच मुखेड भागातील असंख्य ग्रामीण विद्यार्थी यांना डॉक्टर संतोष शेंबाळे श्रेय देतात…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button