https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

बागवान बीरादरीवर शोककळा:बागवान समाजाचे अध्यक्ष अ. रहिम संन्दलजी बागवान यांचे दुःखद निधन

मानवत / प्रतिनीधी.

मानवत शहरातील राज गल्ली हजाम बावडी परिसरातील रहिवाशी अब्दुल रहिम संन्दलजी बागवान यांचे १३ मार्च रोजी अल्पशा आजाराने सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ८० वर्ष होते.
अब्दुल रहिम संन्दलजी हे मानवत येथील बागवान पंच कमिटीचे अध्यक्ष तसेच मोठी इदगाह कमिटीचे ते पदसिद्ध सदस्य होते गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यात ते अग्रेसर असायचे प्रत्येक व्यक्ती बरोबर मन मिळाऊ स्वभावाने रहायचे मुस्लिम समाजाचे कोणते हि कार्य असो ते सर्व प्रथम उपस्थित राहायचे अशा दिलदार व्यक्तमत्व असणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्याने शहरातील नागरिकांना एक मोठा धक्का बसला आहे.
अब्दुल रहिम संन्दलजी यांचा मानवत येथील छोटा कब्रस्तानात येथे दफन विधी करण्यात आला त्यांच्या पश्चात, पत्नी मुले, मुलगी, भाऊ, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे बागवान समाजाची कधी न भरून निघणारी हानी झाली असून समाज बांधव व नागरीकांतुन दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामूळे बागवान समाजावर शोक कळा पसरली आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704