https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा ’ हा उपक्रम दोन हजार तेवीस तिंरगे झेंडे मोफत वाटप

प्रतिनिधी:

सतत दुसऱ्या वर्षी हिंदुस्तानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा ’ हा उपक्रम भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने राबविण्यात येणार असून या वर्षी लोकसहभागातून २०२३ तिरंगे झेंडे मोफत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले होते.त्यानुसार नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, लायन्स प्रांतपाल ला. सुनील देसरडा, लायन्स ग्लोबल सर्विस टीम समन्वयक योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात घरोघरी जाऊन तिरंगे झेंडे वितरित करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी २०२२ तिरंगे ध्वज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते, पण नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिल्यामुळे ३००० ध्वज वितरीत करण्यात आले. हे वर्ष २०२३ असल्यामुळे तितकेच तिरंगे ध्वज वितरणाचा संकल्प करण्यात आला आहे. आत्तापर्यंत ५५० झेंड्याची व्यवस्था झाली आहे. त्यामध्ये पोस्ट बचत एजंट संघटना प्रदेश उपाध्यक्ष सचिन शिवलाड यांच्यातर्फे २०० झेंडे वितरित करण्यात येणार आहेत. प्रत्येकी १०० झेंडे देण्यासाठी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,पोस्ट बचत एजंट संघटना सचिव तथा लायन्स माजी अध्यक्ष संजय अग्रवाल,विवेक सिंह गोरखपुरवाले पुणे यांनी संमती दिली आहे.अजय लक्ष्मणराव डहाळे सराफा होळी नांदेड यांनी ५० झेंडे दिले आहेत.

पूर्वी तिरंगा ध्वज फक्त शासकीय इमारतीवर लावता येत असे. परंतु २०२२ मध्ये ध्वजसंहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्यांना हा अधिकार मिळाला. आज जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा फडकविता येतो.भारतीय ध्वज संहितेच्या कलम २.१ नुसार प्रत्येक व्यक्तीला तिरंगा फडकविण्याचे स्वातंत्र्य आज आहे.तिरंगा फडकवताना तिरंग्याचा आदर सर्वोतोपरी असला पाहिजे.यासाठी खालील गोष्टींची दक्षता घेणे आवश्यक आहे. कधीही गलिच्छ किंवा फाटलेला तिरंगा झेंडा फडकवू नये.तिरंगा कधीही उलटा फडकवू नये. तिरंगा फडकावताना वरच्या बाजूला भगवा रंग असला पाहिजे.
ध्वज कुणापुढे झुकता कामा नये. तिरंग्याभोवती इतर कोणताही ध्वज त्याच्यापेक्षा उंच नसावा किंवा त्याच्या बरोबरीचा असू नये.तिरंग्याच्या खांबावर इतर काहीही ठेवू नका. यामध्ये फुलांच्या हार किंवा इतर चिन्हाचा समावेश आहे.तिरंगा फडकवताना तो जमिनीवर किंवा पाण्यात नसावा.राष्ट्रध्वजाचा वापर ड्रेस म्हणून करू नये. रुमाल, उशी किंवा अशा कोणत्याही वस्तूवर तिरंगा राष्ट्रध्वज वापरू शकत नाही.राष्ट्रध्वज तिरंग्यावर काहीही लिहिता येणार नाही.

२×३ आकाराचा तिरंगा झेंडा, काठी व दोरी नांदेड शहरातील गरीब वस्त्यांमध्ये वितरीत करण्यात येणार आहेत. १०० झेंड्यांसाठी दानशूर नागरिकांनी ₹ ३०००/- मदत करायची आहे.देणगीदारांची यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करून दररोज ५०००० लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या वर्षीच्या संकल्पपूर्तीसाठी आणखी १४७३ तिरंगा ध्वजाची आवश्यकता आहे.त्यामुळे जास्तीत जास्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन लायन्स सेंट्रल अध्यक्ष ॲड. उमेश मेगदे,सचिव शिवाजी पाटील,कोषाध्यक्ष सुनील साबू, आणि
भाजपा जिल्हा सरचिटणीस नांदेड तथा लयंस्त प्रोजेक्ट चेअरमन दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704