सौ सरस्वती चव्हाण विद्यालय वझुर बु शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मानवत // प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील वझुर बु येथील सौ सरस्वती चव्हाण विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी वझुर खू येथील ग्रामसेवक भोसले साहेब सरपंच पोलीस पाटील पांडुरंग शिंदे वझुर बु चे उपसरपंच मनोज चव्हाण माजी सरपंच राम गिराम शालेय नियामक मंडळाचे उपाध्यक्ष दत्तराव चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन व स्वागत गीताने स्वागत करण्यात आले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन 2023 मध्ये 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती धारक तसेच MTS परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देउन सन्मानित करण्यात आले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने माजी सैनिक दिवंगत भानुदास तुपसमुंद्रे यांच्या स्मरणार्थ जि प शाळा व्यवस्थापन समिती वझुर बु चे उपाध्यक्ष मारोती तुपसमुंद्रे यांचा मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी सत्कार केला.
या नंतर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. बालविवाह शपथ व रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा सर्व उपस्थितांनी घेतली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी वाव्हळे या विद्यार्थीने व सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख रोडे सर यांनी केले तर प्रास्ताविक भगवान भस्के सरांनी केले. कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक मंगेश चव्हाण माधव इंगोले विवेकानंद सलगर चंद्रकांत रागोले तसेच अनिता साबळे महिला मदतनीस मनिषाताई वाव्हळे व भाऊसाहेब चव्हाण शिवाजी कोपनर यांनी परिश्रम घेतले. ध्वनिक्षेपक साठी गुणाजी वाव्हळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
***