https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला; “जीवनगीत “: लैलेशा भुरे

*जीवनगीत*
**************************
जीवनातील सकारात्मक गोष्टींचा
गुणाकार केला पाहिजे
जे जे नकारात्मक
त्याचा भागाकार केला पाहिजे

हसतानाही मनसोक्त
हसता आले पाहिजे
रडतानाही विनासंकोच
रडता आले पाहिजे

जे जुळणारे आहे
त्याला जोडून घेतले पाहिजे
जे नियंत्रणाबाहेर आहे
त्याला सोडून दिले पाहिजे

जे सुंदर, पवित्र
ते आचरणात आणले पाहिजे
जे वाईट आहे
त्याचा त्याग केला पाहिजे

जे इतरांचे आपल्याला पटते
ते घेतले पाहिजे
जे अडचणीचे वाटते
ते सोडून दिले पाहिजे

आयुष्याला मोजमाप न लावता
मस्त जगता आले पाहिजे
व्यक्ती तितक्या प्रकृती जाणून
आयुष्य आनंदी केले पाहिजे

नाही मिळत सगळेच सर्वांना
म्हणून जगणे सोडायचे नाही
प्रत्येकालाच माती व्हायचे आहे
उगाच स्वतःला मिरवायचे नाही
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704