https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

भीमशक्ती सामाजिक संघटनेची विभागीय बैठक नांदेड येथे संपन्न

नांदेड:
भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आदरणीय “चंद्रकांतजी हंडोरे साहेब” यांच्या आदेशावरून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या आढावा बैठका राज्यभर सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यासाठी मराठवाडा विभागीय आढावा बैठकीचे आयोजन नांदेड येथे 28-08-2023 या तारखेला हॉटेल ताज पाटील येथे दुपारी 12 वाजता करण्यात आले होते. या बैठकीस सर्व भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी, तालुकाध्यक्षांनी, युवक आघाडी,विद्यार्थी आघाडी या सर्वांनी बैठकीस शेकडो प्रमाणात उपस्थिती दर्शवली. यावेळी भीमशक्ती सामाजीक संघटनेचे जेष्ठ नेते तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिनकर दादा ओंकार,मराठवाडा अध्यक्ष संतोष भिंगारे, राज्य सरचिटणीस प्रमोद रत्नपारखी, राज्य सरचिटणीस
पंडित भाई नवगिरे, राज्य उपाध्यक्ष विजय दादा सुखदेव, मराठवाडा उपाध्यक्ष भास्कर दादा साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये महागाई, दलितांवरील अत्याचार, वाढती बेरोजगारी आणि पक्ष संघटन मजबुतीसाठी विशेष चर्चा झाली.
ही बैठक चंद्रकांत भोकरे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष, शत्रुघन वाघमारे दक्षिण जिल्हाध्यक्ष, संजय कवठेकर शहराध्यक्ष, सुरेश दादा हटकर युवा जिल्हाध्यक्ष, सुखदेव भिसे तालुकाध्यक्ष, प्रकाश गव्हाणे जिल्हा उपाध्यक्ष, प्रभाकर घाटे जिल्हा उपाध्यक्ष, साहेबरावजी पुंडगे कार्याध्यक्ष, राजपाल गच्चे जिल्हा संघटक,संतोष भद्रे युवा उपाध्यक्ष, स्वप्निल उकंडे,अक्षय भालेराव, आकाश कांबळे, शिवराज गायकवाड, गंगाधर सोनकांबळे या सर्वानी हॉटेल ताज पाटील येथे यशस्वी रित्या पार पाडली.
सूत्रसंचालन युवा जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर यांनी केले.आभार सुखदेव भिसे नांदेड तालुका अध्यक्ष यांनी मानले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704