https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आज पेडगाव येथे होत असलेल्या संत रविदास महाराज यांच्या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा विनोद असोरे.

मानवत / प्रतिनिधी

दिनांक १९/ १२/ २०२३ मंगळवार रोजी पेडगाव येथे समस्त चर्मकार समाज बांधव आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा परभणी यांच्या वतीने श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या मूर्ती स्थापनेची प्राणप्रतिष्ठा होत असून त्या निमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम मंगळवारी सकाळी आठ वाजता संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ प्रमुख संभा वाकुजी वाघमारे, समाज भूषण सहादूजी ठोंबरे, कात्रज तिसरे धाम पुणे येथील अमोल महाराज, जिल्हाध्यक्ष मुरलीधरजी ठोंबरे यांच्या सह अनेक मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती राहणार आहे.
तर यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेडगाव येथील संत शिरोमणी गूरू रविदासजी महाराज मंदिर समिती गुरु रविदासजी महाराज अन्नछत्र परभणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व समाज बांधव आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी माता भगिनींनी आप आपले व्यवसाय एक दिवस बंद ठेवून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पेडगाव येथील रविदास मंदिर समिती चे अध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष विनोद किशनराव असोरे यांनी केले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704