ताज्या बातम्या

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी दिल्ली आंदोलनात सहभागी.

मानवत // प्रतिनिधी.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ अराजकीय सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी सामाजिक समाज कल्याण व न्याय मंत्री मा. श्री बबनराव घोलप साहेब यांनी देशातील चर्मकार बांधवाना हाक दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर येथे सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत निदर्शने आंदोलन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
यासाठी संपूर्ण भारतातून हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्र युवा सचिव संजयजी सोनटक्के साहेब ,हिंगोली युवा अध्यक्ष प्रा.माणिक चव्हाण ,परभणी जिल्हा अध्यक्ष श्री मुरली ठोंबरे , युवा कार्यकर्ते विशाल बनसोडे सह अनेक पदाधिकारी मुंबई ,नाशिक,औरंगाबाद, नांदेड अशा विविध जिल्हयातून शेकडो कार्यकर्ते दिल्ली आंदोलनात दाखल झाले आहेत.

***

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button