सावळी येथे अखंड हरिनाम साप्ताहाचे आयोजन*

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथे ०५ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान अखंड हरीनाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून श्रीमद भागवत कथा व जगतगुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा अयोजित करण्यात आला आहे. श्रीमद भागवत कथा प्रवक्ते म्हणून श्री. ह. भ. प. दत्तात्रय महाराज लहुळकर यांची उपस्थिती लाभणार आहे. सप्ताहा मध्ये काकडा भजन,विष्णू सहस्त्रनाम, तुकाराम महाराज गाथा पारायण, भागवत कथा, हरिपाठ, हरी कीर्तन, असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार असून ०५ डिसेंबर रोजी ह. भ. प. तुकाराम महाराज ठाकुरबुवा दैठणकर यांचे कीर्तन होणार आहे. तर ०६ डिसेंबर रोजी ह. भ. प. भागवत महाराज कदम आवलंगावकर यांचे कीर्तन होणार आहे. ०७ डिसेंबर ह. भ. प. हनुमान महाराज रनेर, ०८ डिसेंबर रोजी ह. भ. प. त्र्यंबक महाराज दस्तापुरकर, ०९ डिसेंबर रोजी ह. भ. प. ज्ञानशिंधू एकनाथ महाराज माने, १० डिसेंबर ह. भ. प रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे, ११ डिसेंबर ह. भ. प माऊली महाराज मुडेकर,ह. भ. प. १००८ आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, १२ डिसेंबर रोजी ह. भ. प. मधुसूदन महाराज ठाकुरबुवा दैठणकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता महारुद्र मंदिर या ठिकाणी होईल. तरी या अखंड हरिनाम साप्ताह कार्यक्र मास जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त सावळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
**