राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ संपर्क प्रमूख संभाजी वाघमारे यांची मानवतला भेट. भेटीत साधला पदाधिकार्यांशी संवाद.

मानवत / प्रतिनिधी.
आज दिनांक २५/११/२०२३ शनिवार रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ संपर्कप्रमुख महान कार्य सम्राट संभाजी वाकोजी वाघमारे यांनी आज मानवत येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली यावेळी मानवत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे सचिव विलास भाऊ पतंगे परमेश्वर पाटील नारायण वैद्य तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या वेळी मानवत तालूका राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संभाजी वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्याचा आढावा घेतला व पदाधिकारार्यांशी चर्चा करून संवाद साधला या वेळी वाघमारे यांनी पदाधिकार्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच चर्मकार समाजातील विविध विषयातील मुद्द्यावर चर्चा करण्यात आली
*