https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

बचत गट हा महिला सक्षमीकरणाचा रोड मॅप आहे- प्रो. शारदा बंडे

नांदेड (वार्ताहार) दि. २ – महिला बचत गट हा एक महिलांचा अनौपचारिक सामाजिक व आर्थिक उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे महिला संघटितपणे एकमेकांना समजून घेत आपल्या सामान्य समस्या सोडविण्यासाठी एकत्र येतात. देशातील लाखो महिला बचत गटाच्या सहाय्याने स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुढे आलेल्या आहेत. बचत गट हा आता महिला सक्षमीकरणाचा रोड मॅप बनला आहे, असे प्रतिपादन प्रो. डॉ. शारदा बंडे यांनी केले. त्या लोकमान्य महाविद्यालय सोनखेड ता. लोहा यांच्यावतीने आयोजित पाली नगर, नांदेड येथे बहिःशाल व्याख्यानमालेत बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समृद्धी महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्वेता कापसे तर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नमाला दुधमल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रा. डॉ. आर. डी. शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात बहिःशाल व्याख्यानमालेचे संक्षिप्त स्वरूपात महत्त्व विशद केले. तद्नंतर दामिनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका केंद्रे यांनी प्रस्तुत बहिःशाल व्याख्यानमालेचे उद्घाटन करून पुढील कार्यक्रमास परवानगी दिली. पुढे बोलताना प्रो. शारदा बंडे म्हणाल्या की, बचत गटाची संकल्पना ही प्रोफेसर युनूस यांच्या ग्रामीण बँक मॉडेलवर आधारित आहे. भारतात १९९० च्या दशकात नाबार्डने स्वयंसेवी संस्थासह बचत गट बँक जोडणी कार्यक्रमासह प्रचारात्मक परिसंस्थेची रचना आणि विकास केला. बचत गटांना बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी १९९८ पासून केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. बचत गटाचे सदस्य ठराविक काळामध्ये एकत्रित येऊन बचत म्हणून ठराविक रक्कम गटात जमा करतात व त्यावर आधारित बचत गटाच्या सदस्याला लघु उद्योगासाठी कर्जाची उपलब्धता करून दिली जाते. बचत गट हा इतका लोकप्रिय झाला आहे की, तो आज नाबार्ड वित्तपुरवठ्याचा जगातील सर्वात मोठा उपक्रम म्हणून ओळखला जातो. गरिबी निर्मूलनासाठी सामुदायिक कृती म्हणून १९९८ मध्ये केरळमध्ये कुडुंबश्री प्रकल्प सुरू करण्यात आला. हा भारतातील सर्वात मोठा बचत गट आहे. परंतु देशातील बहुतांश महिलांना बचत गट उपक्रमांतर्गत योजनांची सविस्तर माहिती नाही. त्यामुळेच ते बचत गटाच्या अनेक योजनांपासून वंचित राहतात. तेव्हा महिला वर्गाने विशेषतः अल्पसंख्यांक समाजातील महिलांनी बचत गटाचे स्वरूप आणि महत्व लक्षात घेऊन आपल्या सामाजिक आणि आर्थिक उन्नयाचा मार्ग निर्धोक करावा असे आवाहनही यावेळी प्रो. शारदा बंडे यांनी केले. सदरील बहिःशाल व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा. सागुरे बालाजी यांनी तर आभार सुजाता खंदारे यांनी मानले. यावेळी सुलोचना दुधमल, आशाताई खंदारे, मंगलबाई हनमंते, द्रोपदाबाई गायकवाड इत्यादींसह बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704