परभणीकरांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तूरा…..* संपादक, तथा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके यांना पूरस्कार प्रदान.

mcr news / manawat
Anil chavan
“जगात जर्मनी
भारतात परभणी”
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते परभणी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सर्वांचे मार्गदर्शक प्रभू दीपके यांना उत्कृष्ट संपादक हा पुरस्कार देण्यात आला.
सविस्तर वृत्त असू की,
छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय परिषदेत संपादक तथा जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके यांना पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदान याबद्दल हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. परभणी जिल्हात गेल्या अनेक वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात दिपके यांनी भरीव योगदान दिले आहे.पत्रकार बांधवांच्या विविध समस्याचे निराकरण करण्यासाठी नेहमी तत्परतेने त्यांचे काम चालू असते त्यातच परभणी मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळात अतिशय भरीव , विविध उपक्रम त्यांच्या नियोजनात राबविले जात आहेत, आज प्रभू दिपके यांना दिलेला हा पुरस्कार निश्चितच परभणीकरांसाठी अभिमानास्पदाचा क्षण आहे.
जगात जर्मनी भारतात परभणी, आपणास पुढील वाटचालीस पत्रकार बांधवांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
***