https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या संघाची निवड.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन)

नांदेड:

दिनांक :12 ते 16 जानेवारी दरम्यान नाशिक येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रिय युवा महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते संपन्न होनार आहे. केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात देशभरातील युवक सहभागी होणार असून या महोत्सवात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा संघ पथनाट्य या स्पर्धेत सहभागी होणार आहे. उदगीर येथे दिनांक 29 ते 31 डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युवक महोत्सवात पथनाट्य स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघास महाराष्ट्र राज्यातून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आणि त्यांची निवड राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी झाली. या मधील सहभागी कलावंत रूद्र शर्मा, अखिलेश पांचाळ, ओमजय पुयड, प्रभोध कवठेकर व अदिती केंद्रे यांनी मानवी जीवनात विज्ञानाचा उपयोग या विषयावर आधारित अत्यंत बहारदार असे पथनाट्य सादर केले. यामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेपासून देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी प्रगत विज्ञानाच्या मदतीने भारत महासत्ता कसा होईल ते आज पर्यंतच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने मानवी जीवन कसे सुखकर होत आहे हे अत्यंत उत्कृष्ट रित्या दर्शविण्यात आले त्याचबरोबर विज्ञानाच्या जोरावर देशाचा पोशिंदा शेतकरी सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने शेती करत आहे याचासुद्धा मागोवा या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणामध्ये घेतला. याच विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावरील युवक महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. या राज्यस्तरीय युवक महोत्सवात महाविद्यालयाच्या अदिती केंद्रे या विद्यार्थिनींने सादर केलेल्या वैयक्तिक लोकनृत्य या कलाप्रकारात महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले तिने सादर केलेल्या लावणीस रसिकांची भरभरून दाद मिळाली, यामध्ये वादक साथीदार म्हणून रविराज भद्रे, देवदत्त मेकाले व पौर्णिमा कांबळे यांची तिला साथ लाभली. जिल्हास्तर व विभाग स्तरावर पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करुण प्रतीक्षा हळदे या विद्यार्थिनीने अत्यंत सुरेख असे पोस्टर काढून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डॉ. मनीष देशपांडे, डॉ. संदीप काळे, डॉ. आनंद आष्ठूरकर, प्रा. किरण वाघमारे, प्रा. अश्विनी खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे, सचिव ॲड. सौ. वनिता जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर, उप-प्राचार्य डॉ. कल्पना कदम, प्रा. अजय संगेवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय डॉ. शशिकांत दरगु, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शालिनी वाकोडकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704