ताज्या घडामोडी
मांडवीच्या नाल्यात आढळले 34 वर्षीय तरुणाचा मृतदेह ……घातपात की अपघात चर्चेला उधान……

मांडवी प्रतिनिधी
मांडवी लगत असलेल्या नाल्यात एक 34 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे
दि 23 ऑगस्ट रोजी अंदाजे दोन ते तीन वाजे दरम्यान मांडवी नजीक असलेल्या नाल्यावर धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात बेवारस व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे सपोनी गंगाधर गायकवाड, पोहेका अस्वले, जानकर, कनाके, ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केले असता त्या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात आढळून आले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मांडवी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मयताचे नाव संभान्ना सत्यान्ना जक्कुला वय 34 वर्ष व्यवसाय मजुरी रा.जमदापूर ता .जी आदिलाबाद तेलंगणा येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिले पुढील तपास सपोनी गायकवाड हे करत आहे.



