https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आई इंग्लिश स्कुलचा विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक पद्धतीच्या बनवल्या श्रीच्या मूर्त्या

शालेय विद्यार्थ्यांचा उपक्रम ; विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांच्या कडून कौतुक

मानवत / प्रतिनिधी.

येथील आई इंग्लिश स्कुल व आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी शाळेत विविध उपक्रम राबवण्यात येत असतात या वर्षी ही गणेश उत्सवाचा अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री गणेशा ची चिखल मातीची मूर्ती, तसेच कागदा पासून मूर्ती तयार करुन पर्याव रणपूरक असा मोलाचा संदेश शालेय विद्यार्थ्यांनी दिला आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व सुबक अशा बनवलेल्या गणपती बाप्पाचा मूर्तीचे पालक व शिक्षक यांचे लक्ष वेधून घेतले या सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांच्या कडून कौतुक करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास आई फाउंडेशन व आई इंग्लिशस्कुलचे संचालक श्री. मुक्तीरामजी गोरे, यांची या वेळी प्रमूख उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आई इंग्लिश स्कुलच्या मुख्याधिपिका श्रीमती. अभिलाषाताई ठाकूर, सिमाताई रासवे, अनुसयाताई परांडे, अर्चनाताई लाड, अश्विनीताई भिसे, अश्विनीताई कुमावत, वैष्णवीताई सुरवसे, मनिषाताई कदम, अनुराधाताई गोलाईत, वैष्णवीताई माकुडे, अंजलीताई पंडित, राणीताई गोलाईत, मोनिकाताई आतकरे, शबाना शेख, आसाराम गोरे यांच्या सह शिक्षक व कर्मचारी यांनी या वेळी परिश्रम घेतले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704