https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

दिलीप कंदकुर्ते यांच्या मागणीला मंजुरी उज्जैनच्या धर्तीवर नांदेड दक्षिणचा विकास करण्याचे ना.मुनगंटीवार यांचे निर्देश

नांदेड-
उज्जैन ( महाकाल) कॅरीडॉर धर्तीवर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याची मागणी नांदेड भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व वने, सांस्कृतिक व्यवहार आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.या मागणीची ना. मुनगंटीवार यांनी गांभीर्याने दखल घेत निर्देश देत
प्रधान सचिवांना मंजुरी देण्याचे आदेशीत केले.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जगप्रसिद्ध प्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा आहे.सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी देश- विदेशातून भाविक दर्शनासाठी येतात. सचखंड गुरुद्वारा येथे हल्ला मोहल्ला, दसरा, दिवाळी, नगर किर्तनसह विविध कार्यक्रम पार पडतात.
तसेच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून प्रसिद्ध गोदावरी नदी वाहते.या गोदावरी नदीच्या काठावर प्राचीन, धार्मिक व ऐतिहासिक काळेश्वर , साईबाबा, शनी, गायत्री, भाळेश्वर, मार्कटेश्वर, नंदी तटेश्वर , गणपती उर्वशी मंदिर आहेत. मतदार संघ हा ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक मानला जातो.त्यामुळे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा उज्जैन ( महाकाल) धर्तीवर विकास करण्याची मागणी भाजपाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी ना. मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.ना. मुनगंटीवार यांनी तत्वतः मान्य केले असून निर्देश दिले आहेत.तसेच मुख्य सचिव यांना मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत.
ना. मुनगंटीवार यांच्या आदेशाने उज्जैन ( महाकाल) कॅरीडॉर धर्तीवर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोदावरी नदीकाठच्या चार ते पाच किलो मीटर परिसराचा कायापालट होणार असून पर्यटकाला वाव मिळणार आहे. गोदावरी काठाचे सुशोभीकरण होऊन अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ निर्माण होणार असून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704