https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नगर परिषद कार्य क्षेत्रातील विविध आस्थापनांनी दुकानाचा प्रथम दर्शनी* नामफलक हा मराठी भाषेत अग्रभागी व ठळक लिहा : न. पा. मुख्याधिकारी कोमलताई सावरे

मानवत / प्रतिनिधी.
नगर परिषद कार्यक्षेत्रातील कार्यरत असलेल्या विविध व्यवसाय प्रकारातील आस्थापनांनी दुकानाचा प्रथम दर्शनी नामफलक हा मोठया अक्षरात व मराठी भाषेत अग्रभागी, ठळक अक्षरात लिहावा असे आवाहन मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमलताई सावरे यांनी केले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनीयमन ) अधिनियम २०१८ च्या नियम क्रमांक ३५ नुसार महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाचा प्रथम दर्शनी नामफलक हा मोठया अक्षरात मराठी भाषेत अग्रभागी ठळक अक्षरात लिहालेला असणे अनिर्वाय असून मा. सर्वोच्च न्यायालयाने बाबत आदेशीत केले असून.
त्यामुळे मानवत नगर परिषद कार्य क्षेत्रातील विविध व्यवसाय आस्थापनांनी प्रथम दर्शनी नामफलक मराठी देवनागरी लिपीत लिहिण्याची कार्य पद्धतीची अंमल बजावणी करणे आवश्यक असून नगर परिषद कार्य क्षेत्रातील व्यवसायिकांनी आपल्या आस्थापनाचा नाम फलक हा मराठी देवनागरी लिपीत लावलेला असावा, आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबर आणखी इतर भाषेत ही लिहू शकता परंतु मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारा पेक्षा लहान असू नये, आस्थापनेचा नावाचा नामफलक मराठी देवनागरी लिपीत लावावा व त्याचे अक्षर लेखन करताना नाम फलकाची सुरवात ही मराठी भाषेतील अक्षर लेखना पासून बंधन कारक आहे पाहणी दरम्यान नमूद नियमाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालया मार्फत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन ) अधिनियम २०१८ कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेश मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी कोमलताई सावरे यांनी केले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704