रेणूकामाता मल्टिस्टेट सोसायटीच्या वतीने भारतरत्न डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त आदर्श शिक्षकांचा सत्कार

{ mcr news / अनिल चव्हाण }
—————————————
मानवत येथे अनेक दशकापासून सामान्य जनतेच्या सेवेत असलेल्या श्री रेणूकामाता मल्टिस्टेट को, अर्बन क्रेडिट सोयायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन मा.श्री.डाॅ. प्रशांत चंद्रकांतराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाले संपूर्ण शाखेत शिक्षक दिना निमित्त विविध किर्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आज मानवत येथील शाखेत भारतरत्न डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी तालूक्यातील ज्ञानार्जनाचे आदर्श धूरा सांभाळणारे आदर्श शिक्षक यांचे श्री रेणूकामाता मल्टिस्टेट शाखा मानवतच्या वतीने मानवत तालूक्यातील शिक्षक बांधवांचा संस्थेच्या वतीने माहिती पूस्तिका, गूलाब पूष्प व पेन देऊन सत्कार शाखा व्यवस्थापक राजेभाऊ सपाटे यांच्या मार्गदराशनाखाले करण्यात आला. यावेळी शिक्षक अनिल चव्हाण, एस.एन. कच्छवे, राम दहे, कैलास अबूज, एस.पी.शहा, गणेश उगले , नितिन लाड, ओम मूळे, विलास खूपसे, सोनालीताई खूपसे, संजय टेहेरे, अशोक भंडारे आदी बांधवांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे कर्मचारी रोखपाल श्रीमती आरतीताई कूलकरार्णी, लिपीक श्रीमती वैशालीताई बारहात्ते, लिपिक विकास राठोड, पालक अधिकारी श्री जगनाडे सर आदींची उपस्थिती होती.
…