ताज्या घडामोडी

प्रतिभा निकेतन महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट पोस्टर स्पर्धा

नांदेड, 15 ऑगस्ट, 2023, सकाळी आठ वाजता प्रतिभा निकेतन महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर इंग्रजी साहित्य संघाची स्थापना करून आजादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने “नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट ” या थीम वर आधारित पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
इंग्रजी साहित्य संघ स्थापनेचे प्रयोजन भाषा कौशल्य व साहित्य रुची निर्माण करून विविध कलागुणांना प्रोत्साहित करून एक हक्काचे व्यासपीठ देणे होय, असे प्रा. डॉ. स्वाती तांडे, इंग्रजी विभागप्रमुख यांनी सांगितले. देशभक्ती, राष्ट्राभिमान रुजवून सर्जनशील अभिव्यक्ती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर सरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर सरांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन, विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये उत्कृष्टतेची वचनबद्धता स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली ज्यामुळे देश आघाडीवर राहील.
उत्साहाच्या आणि देशभक्तीच्या वातावरणात पारंपारिक साहित्याच्या सीमा ओलांडलेल्या कॅनव्हास वर कलात्मकता प्रदर्शित करण्यासाठी सहभागी स्पर्धक एकत्र आले. शब्द आणि प्रतिमांच्या द्वारे स्पर्धकांनी त्यांचे विचार आणि कल्पकता व्यक्त केली.

पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य किशोर गंगाखेडकर सरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. दिलीप स्वामी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. भाग्यश्री मदेवाड, डॉ. सय्यद रुकसाना, प्रा. जुनेद मिर्झा तसेच मंजीत कौर, गिरीश दुधमल, शैलेश कोकरे, तनुश्री कांबळे, प्रियंका येनगडे, शितल कोकरे, अलोक सरोदे, अपूर्वा पालीमकर, आर्या देव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजबिंदर कौर यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.