https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अमरनाथच्या गुहेतून… भाग शेवटचा लेखक: धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

नांदेड;

अनेक वाचकांनी आगामी टूर बाबत विचारणा केली. आमच्या आगामी टूर पुढील प्रमाणे आहेत.
(१३वी चारोधाम यात्रा -२९ सप्टेंबर २०२३)
(६वी आयोध्या काशी प्रयाग -ऑक्टोबर २०२३)
(३ रा हिमाचल टूर -नोव्हेंबर २०२३)
(९ वी सोमनाथ द्वारका यात्रा -डिसेंबर २०२३)
(१३ वी गंगासागर पुरी यात्रा -२ जानेवारी २०२४)
(१८ वी रामेश्वर कन्याकुमारी यात्रा -फेब्रुवारी २०२४)
(६वा नेपाळ टूर -मार्च २०२४)
(५वा केरळ टूर -एप्रिल २०२४)
( १४वी चारोधाम यात्रा -मे २०२४)
(२३वी अमरनाथ यात्रा -जुन २०२४)
(८

या लेखमाले बद्दल प्रतिक्रिया देण्याचे आवाहन कालच्या लेखात मी केले होते.शेकडो वाचकांनी लेखमाला आवडल्याचे कळविले.पण जागेअभावी काही निवडक प्रतिक्रिया इथे देण्यात येत आहेत.

*प्रा. विद्याधर पाटील,नांदेड*
धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांची “अमरनाथच्या गुहेतून ” ही लेखमाला रोज वाचत होतो. एक राजकारणी व्यक्ती इतके सुंदर लिखाण करू शकते यावर विश्वास बसत नाही. कोणताही बडेजाव न करता प्रामाणिकपणे लिहलेले वर्णन वाचून असे वाटते की, आपण स्वतः त्यांच्या सोबत प्रवास करीत आहोत.पुढे काय होणार याची उत्कंठा सतत लागलेली असायची.कितीही कठीण प्रसंग असला तरी न घाबरता त्यातून मार्ग काढण्याचे दिलीपभाऊंचे कसब वाखागण्याजोगे आहे. विविध उपक्रम राबविण्यात हतखंडा असलेल्या भाऊमध्ये गुण आहेत तरी किती? असा प्रश्न पडतो. हे प्रवास वर्णन वाचून पुढील वर्षी भाऊ सोबत अमरनाथ ला जाण्याचा निर्धार आम्ही केला आहे.वाचकांच्या मनाला भावणारी साहित्यकृती आपल्या हातून घडली त्याबद्दल अभिनंदन.

*सौ.अनघा शृंगारपुरे*
धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर यांच्या भाऊ ट्रॅव्हल्स सोबत केलेली अमरनाथ यात्रा हा आम्हा उभयतांसाठी एक सुखद अनुभव* म्हणायला हवा. अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी दिलीपभाऊ जे संपूर्ण नियोजन करतात ते यानिमित्ताने लक्षात आले.जसे की,अमरनाथला जाण्यापूर्वी यात्रेकरूंचे मनोबल वाढावे आणि शारीरिक क्षमतेचा विकास व्हावा यासाठी भाऊ यात्रेकरूंना रोज ६ किलोमीटर पायी चालण्याचा सराव आणि त्यासोबतच प्राणायामाचा जो सराव करून घेतात.त्यामुळे अमरनाथ व वैष्णोदेवी ला जाणाऱ्यांना निश्चितच फायदा होतो. अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असलेले अमरनाथ यात्रा दिलीपभाऊंच्या वीस वर्षाच्या अनुभवामुळे आणि कुशल नियोजनामुळे सुसह्य होते.
या यात्रेच्या निमित्ताने या परिसरात भाऊंची किती मोठ्या प्रमाणात ओळख आहे याची प्रचिती आली. केवळ भाऊंच्या शब्दाखातर ७० /७५ लोकांच्या समूहाची भोजनाची व नाश्त्याची व्यवस्था करणारे अनेक लोक आम्हाला या प्रवासात भेटले.
आमची अमरनाथ दर्शनाची तारीख ४ जुलै ही होती. हा संपूर्ण दिवस निसर्गाने साथ दिली आणि त्या दिवशी दर्शनास जाणाऱ्या सर्वच भाविकांचे दर्शन खूप छान पद्धतीने झाले. संध्याकाळ पासून मात्र निसर्ग रुसला. कडाक्याची थंडी पडली. सतत बरसणाऱ्या पावसामुळे पुढचे तीन दिवस प्रशासनाने दर्शन बंद ठेवले. निसर्गाची साथ आणि ईश्वराची कृपा यामुळे अमरनाथ यात्रेकरू संघाच्या आम्हा ७१ जणांच्या समूहाची यात्रा व्यवस्थित पार पडली. अमरनाथ आणि वैष्णोदेवी दर्शन सोबतच भाऊंनी आम्हाला भारताचे नंदनवन म्हटले गेले आहे त्या काश्मीरची सफर देखील घडवली. जम्मू येथील रघुनाथ मंदिरा सोबत अमृतसर सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि अटारी बॉर्डर चे दर्शन करून आम्हा मध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. या सर्वच ठिकाणी भाऊंनी यात्रेकरूंची राहण्याची केलेली व्यवस्था ही अत्यंत दर्जेदार अशी होती. अमरनाथ यात्रा हा दिलीपभाऊ ठाकूर यांचा आस्थेचा विषय असल्यामुळे ते ही यात्रा खरच “ना नफा ना तोटा ” या तत्त्वावर करतात याची आम्हाला खात्री पटली आहे. महाराष्ट्रातील भाविकांसाठी येणाऱ्या काही वर्षात अमरनाथ यात्रा म्हणजे भाऊ ट्रॅव्हल्स अर्थात दिलीपभाऊ ठाकूर असे समीकरण झाल्यास त्यात मला तरी आश्चर्य वाटणार नाही. या सर्व व्यवस्थेसाठी दिलीप भाऊ ठाकूर आणि त्यांचा सहकारी अमोल गोळे यास मनःपूर्वक धन्यवाद.

*उमेश महाराज तळणकर,अध्यक्ष गजानन महाराज मंदिर*
दिं.१३ जुलैला २१ वी अमरनाथ
यात्रा आपल्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडली.परत दिं.१४ जुलैला आपण २२ व्या अमरनाथ यात्रेसाठी पुन्हा तयार झालेले पाहून नवल वाटले.भाऊ तुमच्या ईच्छा शक्ती ला कोपरापासून नमस्कार …

*अशोक चनमनवार*
सहलीच्या आनंदाबरोबर घरी सुखरूप पोहोचण्याचा ही आनंद वेगळाच असतो.
तो सर्वांनी अनुभवला.
आम्हीही घरी राहून सुद्धा आपल्या छान, सुंदर प्रवासी लेखाद्वारे अमरनाथ यात्रेचा आनंद घेतला. प्रवासवर्णन शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
कृपया आगामी टूरबद्दल माहिती द्यावी.

*डॉ.अमरसिंह महाले ठाणे*
अत्यंत सुंदर लेखन.
वाचताना आम्ही देखील तुमच्या बरोबर असल्याचा भास होत होता.
आपल्या पुढील धर्मकार्यास शुभेच्छा 💐💐

*दिमाकाका देशमुख, संस्कार भारती*
वकील साहेब धन्यवाद, आपल्या लेखमालेमुळे घरबसल्या संपूर्ण यात्रा दर्शनाचा लाभ होतोय.
भोलेबाबाची कृपा सदैव आपलेवर असावी.
जयजय बर्फानी बाबा की

*विजयकुमार विठ्ठलराव अतकुरकर-
आदरणीय भाऊ, आपण सुखरुप व निर्विघ्न हि अमरनाथ यात्रा संपन्न केलात. केवळ तुमच्याकडे असलेली मेहनत करणारी सर्व टिमवर्क व तुमच्या कामाचे योग्य आयोजन व नियोजन हे मी जवळुन अनुभवलो .पण भाऊ या वेळेस मी लेख वाचत असताना थोडी काळजी वाटली. ते म्हणजे ट्रेन रद्द झाली. कसे जायचे हा प्रसंग फारच कठीण होता. पण तुमच्या कार्यतत्परतेमुळे तुम्हीं सर्व यात्रेकरुना विश्वास व आधार देऊन जे नियोजन केलात. खरच तुमच्या त्या कठीण प्रसंगी घेतलेल्या निर्णयाला मनापासून सलाम आहे. अचानक असे प्रसंग आल्यावर खरच मनात घबराट होतेच, पण ते तुम्हीं मिल्ट्री च्या कंमाडंर प्रमाणे हाताळलात. भाऊ तुमच्या ह्या दररोज च्या लेखामुळे भरपुर शिकायला मिळाले. त्याबद्दल परमेंश्वर तुम्हांला उदंड दीर्घायुष्य व अशा कठीण प्रसंगी योग्य नियोजनाचे बळ देवो व सदैव त्यांचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहो हिच परमेंश्वर चरणी प्रार्थना.

*सुधाकर ब्रह्मनाथकर,संभाजीनगर*
नमस्कार जय भोलेनाथ,
दिलीपभाऊ सोबत ३-४ वर्षा पासुन अमरनाथ यात्रेत सहभागी होणाच्यी ईच्छा होती.पण योग या वर्षी जूळून आला.
सर्व प्रवास सुखकर व आरामशीर झाला.
सर्व देवदर्शन अविस्मरणीय झाले.
भाऊच्या नेतृत्वामूळे इतकी कठीण यात्रा सहजसुंदर झाली.अगदी मनापासून दिलीपभाऊ ठाकूर यांचे व यात्रेत सहभागी झालेल्याचे आभार.

सर्व वाचकांना विनंती करण्यात येते की,२१ व्या व २२ व्या अमरनाथ यात्रेच्या यशस्वीतेबद्दल प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि.२८ जुलै २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर, कलामंदिरच्या मागे, सोमेश कॉलनी नांदेड येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी येऊन आमच्या आनंदात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
*संयोजक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर*
(समाप्त)

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704