https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आज मानवतला साने गूरूजी सभागृहा मध्ये प्रनील गिल्डा यांचे युवकांना मार्गदर्शन

मानवत / प्रतिनिधीब

हुतांश विद्यार्थी करियर निवडताना स्पर्धा परीक्षेला प्रथम प्राधान्य देतात. तसेच विविध ठिकाणी पदभरती करताना स्पर्धा परीक्षा अनिवार्य झाल्या आहेत. याकरिता साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने मिरज जि. सांगली येथे पोलिस उपअधिक्षक पदावर कार्यरत असलेले परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले प्रनिल गिल्डा यांचे स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेत करियर करणाऱ्या विद्यार्थ्यानी कार्यक्रमास उपस्थित रहावे आवाहन साने गुरुजी वाचनालय च्या वतीने करण्यात आले आहे . मार्गदर्शन कार्यक्रम रविवार २० ऑगस्ट रोजी सकाळी १०:४५ वा. साने गुरुजी वाचनालय, मानवत. येथे ठेवण्यात आले आहे तज्ञ मार्गदर्शक यांची माहिती अशी प्रणिल प्रफुल्ल गिल्डा यांचे जन्मगाव – सेलू असून त्यांचे शिक्षण – बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ( शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय , औरंगाबाद ) एम.ए. लोकप्रशासन ( पोलीस प्रशासन विषयामध्ये विशेष प्रावीण्य ) डिप्लोमा : सायबर क्राइम असे आहे तसेच त्यांचे अनुभव – टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये २ वर्षे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर येथे एक वर्षे , उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली येथे २ वर्षे सेवा व सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून मिरज , जिल्हा सांगली येथे कार्यरत असून ते पुणे येथे विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेस मध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतात त्यांना विशेष आवड आणि प्रावीण्य- गणित , मराठी साहित्य , लोकप्रशासन आदी विषयात असून त्यांचे एम. पी. एस. सी CSAT या विषयाची २ पुस्तके मॅकग्रा हिल्स या नामांकित प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आले आहेत तसेच त्यांना एम पी एफ पुणे यांचेकडुन उत्कृष्ट युवा प्रशासकीय अधिकारी २०२२ पुरस्कार , पोलीस महासंचालक यांचे २०२३ चे पदक – नक्षलग्रस्त भागामध्ये लोकाभिमुख पोलीस प्रशासनाकरिता हे पदक प्रदान हे पुरस्कार त्यांना आज पर्यंत देण्यात आले असून अशा या युवा अधिकाऱ्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल या करीता सानेगुरुजी वाचनालय यांचे कडून विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमच आयोजन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704