यशवंत ‘ मध्ये दुग्धशास्त्र विभागात स्टूडेंट इंडक्शन प्रोग्राम संपन्न

नांदेड :(दि.७ ऑगस्ट २०२५)
श्री.शारदा भवन एज्यूकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात दुग्धशास्त्र विभागातर्फे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पदवी व पदव्युतर डेअरी सायन्स अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सत्रआरंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
व्याख्यानाचा विषय,’ डेअरी सायन्स विषयातील उद्योजकता विकास व भविष्यातील संधी’ होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ.कविता जी.सोनकांबळे यांनी भूषविले. प्रमुख पाहूणे डॉ.आर.जी. चिल्लावार, विभागप्रमुख, बायोटेक्नॉलॉजी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड व प्रमुख वक्ते मार्गदर्शक प्रवीण साधू, श्रीराम फुट प्रा. ली., नांदेड यांनी विद्यार्थ्यांना डेअरी उद्योजकता दुग्धजन्य पदार्थाचे व्हॅल्यू एडिशन करून मार्केटमध्ये ब्रँड कसा तयार करता येईल, व स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा तसेच डेअरी क्षेत्रात भविषातील संधी, व्याप्ती यावर मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत विभागप्रमुख डॉ.आर. एस.सोनवणे यांनी केले. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना आपले उज्वल भविष्य घडविता येते, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ.आर.जी.चिल्लावार यांनी, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांची मानवी जीवनासोबत जोडलेली नाळ याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात, विद्यार्थ्यांना डेअरी सायन्स विषयाचे महत्त्व सांगत दुधापासून तयार होणाऱ्या व्हॅल्यू ऍडेड पदार्थात तंत्रज्ञान अवगत करण्याची गरज आहे तसेच पशुपालन, ऑरगॅनिक फार्मिंग व व्यावसायिक प्रगतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान फार उपयुक्त ठरेल, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन निकिता गुंठापल्ले यांनी केले. वैभव पावडे, धनश्री गौड या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले आणि आभार संशोधक विद्यार्थी श्री.बी.डी.लांडगे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एम.एससी. द्वितीय वर्षातील विद्यार्थी ए.बी.सिंगेवाड यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.